गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी राजापूरमध्ये शोभायात्रेचे आयोजन


✍️राजू सागवेकर/राजापूर
▪️ गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या स्वागतार्थ राजापूर शहरात भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. या शोभायात्रेत लांजा-राजापूर-साखरपा विधानसभेचे आमदार किरण सामंत यांनी उपस्थित राहून सर्व नागरिकांना गुढीपाडवा आणि नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
▪️ या सोहळ्याचा एक विशेष क्षण म्हणजे आमदार किरण सामंत यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शोभायात्रेत राजापूर शहरातील हजारो हिंदू बांधव आणि भगिनींनी उत्साहात सहभाग घेतला. पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांच्या गजरात आणि गुढ्यांच्या सजावटीने संपूर्ण शहर सणाच्या आनंदात न्हाल्याचे दृश्य होते.
▪️ या सोहळ्यामुळे राजापूर शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते, आणि नागरिकांनी आनंदाने गुढीपाडव्याचा सण साजरा केला.