आमचा वक्फ विधेयकाला विरोध नसून त्यातील भ्रष्टाचाराला विरोध; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

 

???? आमचा वक्फ विधेयकाला विरोध नसून त्यातील भ्रष्टाचाराला विरोध; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल

 

मुंबई–  वक्फ सुधारणा विधेयक जर मुस्लिमांच्या हिताचे आहे तर हिंदुत्व आम्ही सोडले की तुम्ही सोडले? उद्या हिंदू देवस्थानावर गैर हिंदू लादला तर ते आम्ही सहन करू का? तर नाही. तसेच वक्फ बोर्डावर गैर मुस्लीम ते कसं सहन करतील. वक्फ बोर्डात काही अफरातफर सुरू असेल तर नक्कीच त्यावर पायबंद घातला पाहिजे. देशाच्या विकासाच्या गोष्टी, रोजीरोटी बाजूला ठेवून हिंदू मुस्लीम केले जात आहे. आम्ही हिंदुत्व सोडले असे काही बाटगे म्हणतात मग तुमच्या आजूबाजूला मुस्लिमांचे कौतुक होत होते तेव्हा तुम्ही का गप्प बसला? असा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी शिंदेसेना आणि भाजपावरहल्लाबोल केला आहे.

 

वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत पारित झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेनाप्रमुखांनी कधीही सगळे मुस्लीम देशद्रोही आहेत असं कधीही म्हटलं नाही. आजही आमच्याकडे शाबीरभाई शेखसारखे कडवट मुस्लीम कार्यकर्ते आहेत. जर तुम्ही हिंदुत्व असाल तर भाजपाने त्यांच्या झेंड्यावरील हिरवा रंग काढावा. फटाक्यांची वात पेटवायची आणि पळून जायचे ही भाजपाची वृत्ती आहे. त्याला आम्ही विरोध केला. वक्फच्या जमिनी बळकावून त्यांच्या व्यापारी मित्रांना दिल्या जाणार त्याचा आम्ही विरोध केला आहे असं त्यांनी म्हटलं. तसेच वक्फ सुधारणा विधेयकात ज्या दुरुस्त्या सूचवल्या त्यावरून तुम्ही मुस्लीम धार्जिणे आहात असं दाखवले जात होते. भाजपाचे नेते अमित शाह, किरेन रिजिजू, टीडीपी, जेडीयू यांनी ज्याप्रकारे मुस्लीम समाजाची भूमिका मांडली.

 

गरीब मुस्लिमांसाठी हे विधेयक आणले. मराठीत त्याला लांगुनचालन म्हणतात तेच तुम्ही करत होता. तोडा, फोडा आणि राज्य करा हे भाजपाचं धोरण आहे. आम्ही हिंदुत्व सोडले असं बोलले जाते, वक्फ सुधारणा विधेयकाचं हिंदुत्वाशी काय देणे घेणे? मुस्लिमांवर बोलायचे, सौगात ए मोदी वाटायचे हे केले जाते. जे चुकीचे आहे ते चुकीचे आहे त्याचे समर्थन आम्ही करणार नाही. वक्फ बोर्डाच्या जमिनीवर भाजपाची नजर आहे. आज मुस्लिमांवर जसे केले तर हिंदूंवरही होणार आहे. केवळ जमिनीसाठी हे विधेयक आणले. आम्ही विधेयकाला विरोध केला नाही तर भ्रष्टाचाराला केला असं उद्धव ठाकरे यांनी सांगितले. दरम्यान, देशाच्या हितासाठी जे आवश्यक आहे त्यावर बोलायला हवं होते. अमेरिकेने भारतावर जो टॅरिफ लावला आहे त्यावर संसदेत चर्चा व्हायला हवी होती. अमेरिकेने जे धोरण राबवले त्यावर भारताची भूमिका काय हे स्पष्ट व्हायला हवी. अमेरिकेने जो टॅक्स लावला तो हिंदू मुस्लिमांवर लावला नाही. हे टॅरिफ देशावर लावले आहे. त्यामुळे यावर संसदेत चर्चा व्हायला हवी अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी केली.

 

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी: आता मिळणार जुनी पेन्शन योजना!

💠 जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी: आता मिळणार जुनी पेन्शन योजना! ### ✅ राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय; १ नोव्हेंबर २००५...
Read More
जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी: आता मिळणार जुनी पेन्शन योजना!

तळवली शाळेतील शिक्षकाचा मनमानी कारभार; निलंबनाऐवजी बदलीवरच समाधान

तळवली शाळेतील शिक्षकाचा मनमानी कारभार; निलंबनाऐवजी बदलीवरच समाधान “अधिकारी खिशात आहेत” म्हणत धमक्या; गंभीर आरोपांनंतरही ठोस कारवाई नाही, पालक संतप्त...
Read More
तळवली शाळेतील शिक्षकाचा मनमानी कारभार; निलंबनाऐवजी बदलीवरच समाधान

बालजगतमध्ये ऐका आमचो ह्यो कोकण

बालजगतमध्ये ऐका आमचो ह्यो कोकण आबलोली (संदेश कदम)  कोकणातलं पर्यटन अनेकांना आवडतं. आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात बघण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत हेच...
Read More
बालजगतमध्ये ऐका आमचो ह्यो कोकण

सिंधुदुर्गात उबाठा गटाला मोठे खिंडार; सुनील नारकर यांच्यासह कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

सिंधुदुर्गात उबाठा गटाला मोठे खिंडार; सुनील नारकर यांच्यासह कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश वैभववाडी तालुक्यात राजकीय भूकंप: जिल्हा परिषद उमेदवार आणि...
Read More
सिंधुदुर्गात उबाठा गटाला मोठे खिंडार; सुनील नारकर यांच्यासह कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

सूर्यवंशी–जुरेलची विजयी भागीदारी; राजस्थानचा आरसीबीवर ६ गडी राखून दमदार विजय

सूर्यवंशी–जुरेलची विजयी भागीदारी; राजस्थानचा आरसीबीवर ६ गडी राखून दमदार विजय मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयपीएल २०२६ मधील १६व्या सामन्यात राजस्थान...
Read More
सूर्यवंशी–जुरेलची विजयी भागीदारी; राजस्थानचा आरसीबीवर ६ गडी राखून दमदार विजय

मंडणगडच्या सुपुत्राचा राज्यस्तरावर गौरव : आयु. अरविंद प्रकाश येलवे यांना ‘छ. शिवाजी महाराज आदर्श युवा पुरस्कार 202

🔴  मंडणगडच्या सुपुत्राचा राज्यस्तरावर गौरव : आयु. अरविंद प्रकाश येलवे यांना ‘छ. शिवाजी महाराज आदर्श युवा पुरस्कार 2026’ 🔵 सामाजिक...
Read More
मंडणगडच्या सुपुत्राचा राज्यस्तरावर गौरव : आयु. अरविंद प्रकाश येलवे यांना ‘छ. शिवाजी महाराज आदर्श युवा पुरस्कार 202

नाट्य कलावंत श्री सुदाम कोळथरकर यांचा वेलदूर नवानगर मराठी शाळेमध्ये सत्कार संपन्न

नाट्य कलावंत श्री सुदाम कोळथरकर यांचा वेलदूर नवानगर मराठी शाळेमध्ये सत्कार संपन्न गुहागर - वेलदूर ग्रामपंचायतीचे माजी सदस्य ,विठ्ठलवाडी ग्रामस्थ...
Read More
नाट्य कलावंत श्री सुदाम कोळथरकर यांचा वेलदूर नवानगर मराठी शाळेमध्ये सत्कार संपन्न

अखेरच्या चेंडूपर्यंत थरार; लखनौची कोलकातावर ३ गडी राखून मात

अखेरच्या चेंडूपर्यंत थरार; लखनौची कोलकातावर ३ गडी राखून मात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयपीएल २०२६ मधील १५व्या सामन्यात लखनौ सुपर...
Read More
अखेरच्या चेंडूपर्यंत थरार; लखनौची कोलकातावर ३ गडी राखून मात

शेत रस्त्यासाठी लढा तीव्र; रत्नागिरी तहसीलदारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, प्रकरण मानवी हक्क आयोगात

  *शेत रस्त्यासाठी लढा तीव्र; रत्नागिरी तहसीलदारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, प्रकरण मानवी हक्क आयोगात* *रत्नागिरी:- निलेश रहाटे जयगड सडेवाडी येथील अल्पभूधारक...
Read More
शेत रस्त्यासाठी लढा तीव्र; रत्नागिरी तहसीलदारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, प्रकरण मानवी हक्क आयोगात

गोव्यात ‘भारत प्रेरणा नॅशनल अवॉर्ड’चा भव्य सोहळा; विलास तुकाराम बाबर यांच्यासह देशभरातील ७७ मान्यवरांचा गौरव

गोव्यात ‘भारत प्रेरणा नॅशनल अवॉर्ड’चा भव्य सोहळा; विलास तुकाराम बाबर यांच्यासह देशभरातील ७७ मान्यवरांचा गौरव पणजी (गोवा) (गुरुदत्त वाकदेकर): देशभरातील...
Read More
गोव्यात ‘भारत प्रेरणा नॅशनल अवॉर्ड’चा भव्य सोहळा; विलास तुकाराम बाबर यांच्यासह देशभरातील ७७ मान्यवरांचा गौरव