रत्नागिरीच्या मांडवी बीचवर सेल्फ क्लिनिंग इको टॉयलेटचे ९ एप्रिल रोजी उदघाटन

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

रत्नागिरीच्या मांडवी बीचवर सेल्फ क्लिनिंग इको टॉयलेटचे ९ एप्रिल रोजी उदघाटन

कोकण ग्रामीण पर्यटन विकास योजनेअंतर्गत समुद्रकिनाऱ्यांवर १३ इको टॉयलेट आणि १३ चेंजिंग रूम युनिट्स उभारणार; ५ कोटींचा निधी मंजूर

मुंबई :

पर्यटनदृष्ट्या महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्याच्या सागरी किनाऱ्यांवरील पर्यटन सोयीसुविधा वाढवण्याच्या दृष्टिकोनातून कोकण ग्रामीण पर्यटन विकास योजनेअंतर्गत सेल्फ क्लिनिंग इको टॉयलेट विथ बायो डायजेस्टर आणि चेंजिंग रूम युनिट्स उभारण्याचे काम सुरू झाले आहे.

 

या योजनेतून भाट्ये, गणपतीपुळे, गणेशगुळे, वेळणेश्वर, लाडघर आणि मुरुड या सहा समुद्रकिनाऱ्यांवर प्रत्येकी १३ इको टॉयलेट आणि १३ चेंजिंग रूम युनिट्स उभारण्यात येणार आहेत. यासाठी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी ५ कोटींचा निधी मंजूर केला आहे.

 

विशेष म्हणजे, मांडवी बीच येथे आमदार आणि भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या स्वखर्चातून इको टॉयलेट युनिट उभारण्यात आले असून, त्याचे उद्घाटन ९ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी त्यांच्या हस्ते होणार आहे.

 

या सुविधांसाठीची मागणी भाजप महिला मोर्चा दक्षिण रत्नागिरीच्या जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे, प्रदेश सचिव शिल्पा मराठे आणि जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी केली होती. त्यांच्या मागणीवर आमदार रविंद्र चव्हाण यांनी पुढाकार घेत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे निधीसाठी प्रयत्न केले.

 

प्रस्तावित कामांची यादी :

| क्रमांक | ठिकाण | इको टॉयलेट युनिट्स | चेंजिंग रूम युनिट्स |

| 1 | भाट्ये बीच, रत्नागिरी | 2 | 2 |

| 2 | गणपतीपुळे बीच, रत्नागिरी | 2 | 2 |

| 3 | गणेशगुळे बीच, रत्नागिरी | 1 | 1 |

| 4 | वेळणेश्वर बीच, गुहागर | 1 | 1 |

| 5 | लाडघर बीच, दापोली | 1 | 1 |

| 6 | मुरुड बीच, दापोली | 2 | 2 |

| एकूण | | 13 युनिट्स | 13 युनिट्स |

 

या उपक्रमामुळे किनाऱ्यावर येणाऱ्या हजारो पर्यटकांसाठी स्वच्छतागृह आणि चेंजिंग रूमच्या मूलभूत सुविधा उपलब्ध होणार आहेत, ज्यामुळे कोकणातील ग्रामीण पर्यटनाला नवी चालना मिळेल.

 

 

#रत्नागिरी #मांडवीबीच #इकोटॉयलेट #कोकणपर्यटन #पर्यटनविकास #SelfCleaningToilet #KonkanTourism #RavindraChavan #JaykumarGore #भाजपमहिला_मोर्चा

 

बातमी: [वार्ताहर शहर| www.ratnagirivartahar.in

 

 

 

Samir Shirvadakar
Author: Samir Shirvadakar

???? समिर शिरवडकर ???? राजापुर तालुका - मिडिया को- ऑर्डीनेटर मु. पो. जैतापूर, ता. राजापुर जि.रत्नागिरी.

bhaskr

Leave a Comment

आणखी वाचा...