जि.प.शाळा पूर्णगड नं.१ मध्ये आरोग्य विषयक मार्गदर्शन; कीटकजन्य व जलजन्य आजारांविषयी जनजागृती
आरोग्य विभागाच्या वतीने शाळेत स्वच्छता व आजारांपासून बचाव यावर माहितीपूर्ण सत्र; विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयी जागरूकता वाढविण्याचा उपक्रम

बातमी:
रत्नागिरी तालुक्यातील जि.प.शाळा पूर्णगड नं.१ येथे आरोग्यविषयक मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात परिसरातील डासांपासून होणारे कीटकजन्य आजार तसेच दूषित पाण्यामुळे होणाऱ्या जलजन्य आजारांपासून बचावासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाय योजनांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
आरोग्य विभागाच्या रत्नागिरी तालुका कीटक नियंत्रण मेस्त्री मॅडम आणि पूर्णगड गावच्या आरोग्यसेविका पावरी सिस्टर यांनी हे मार्गदर्शन केले. त्यांनी परिसर व वैयक्तिक स्वच्छतेचे महत्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांना स्वच्छता पाळण्याचे महत्त्व पटवून दिले.
या उपक्रमाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापिका सौ. भारती तायशेटे
तसेच शिक्षकवृंद – पूर्वा वाकडे, भारती शिंगाडे व राजेंद्र रांगणकर यांनी समाधान व्यक्त केले. शाळेच्या वतीने आरोग्य विभागाच्या या उपक्रमाला शुभेच्छाही देण्यात आल्या.
हॅशटॅग्स:
#आरोग्यविषयकमार्गदर्शन #RatnagiriNews #ZPSchool #SwachhtaAbhiyan #HealthAwareness #SchoolEvents #JaljanyaAjar #KitakjanyaAjar #ZPRatnagiri #PurnagadSchool
