कोकण रेल्वे मार्गावर धावणार एसी लोकल
उन्हाळी गर्दीचा विचार; मुंबई ते गोवा साप्ताहिक वातानुकूलित गाडी प्रवाशांसाठी उपलब्ध
नवी मुंबई | मंगेश जाधव
उन्हाळी सुट्टीची चाहूल लागताच कोकणात पर्यटनासाठी जाणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ही वाढती प्रवासी गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ते गोव्याच्या करमाळीदरम्यान संपूर्ण वातानुकूलित साप्ताहिक एक्स्प्रेस सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
११ एप्रिल ते २३ मे २०२५ या कालावधीत दर शुक्रवारी लोकमान्य टिळक टर्मिनसहून ही गाडी रात्री १०.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १२ वाजता करमाळी स्टेशनवर पोहोचेल. परतीची गाडी १२ एप्रिल ते २४ मे दरम्यान करमाळी येथून दुपारी २.३० वाजता निघून दुसऱ्या दिवशी पहाटे ४.०५ वाजता मुंबईला पोहोचेल.
ही वातानुकूलित गाडी २२ एलएचबी डब्यांची असणार असून प्रवाशांना अत्याधुनिक आणि आरामदायी सेवा मिळणार आहे. यातील आरक्षण ८ एप्रिलपासून खुले झाले आहे.
स्थानके (थांबे):
ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, आणि थीवी.
या निर्णयामुळे कोकणातील प्रवाशांमध्ये समाधानाची भावना असून पर्यटन हंगामात आरामदायी प्रवासासाठी ही गाडी मोठी भेट ठरणार आहे.
#कोकणरेल्वे #एसीएक्स्प्रेस #उन्हाळीसुट्टी #गोवात्रिप #रेल्वेबातमी #मुंबईकरमाळी #KonkanRailway #SummerSpecialTrain
—
संपूर्ण बातम्या वाचण्यासाठी भेट द्या:
—