???? देशभरात यंदा धो-धो पाऊस! महाराष्ट्रातही पावसाचं प्रमाण चांगलं राहणार
लालीनानंतरही समाधानकारक मान्सून; स्कायमेटनं दिला दिलासादायक अंदाज
नवी मुंबई (मंगेश जाधव) | www.ratnagirivartahar.in
यंदा संपूर्ण देशासह महाराष्ट्रातही पावसाचं समाधानकारक चित्र पाहायला मिळेल, असा अंदाज हवामान विषयक ख्यातनाम संस्था स्कायमेटने वर्तवला आहे. स्कायमेटच्या प्राथमिक मान्सून अहवालानुसार, यावर्षी पावसाचं प्रमाण सरासरीच्या १०३ टक्के इतकं राहण्याची शक्यता असून, जुलै ते सप्टेंबरदरम्यान चांगला पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे.
स्कायमेटच्या तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनची सुरुवात जून महिन्यात संथ गतीने होईल. मात्र, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. यावेळी देशभरात ८९५ मिमी पावसाची शक्यता आहे.
राज्यवार पावसाचं चित्र –
महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा – सरासरीपेक्षा अधिक पाऊस
आसाम, अरुणाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर – कमी पावसाची शक्यता
महिन्यानुसार पावसाचं संभाव्य प्रमाण –
जून: 158.7 मिमी
जुलै: 286.1 मिमी
ऑगस्ट: 275.3 मिमी
सप्टेंबर: 174.6 मिमी
ला लीनाची स्थिती बदलली असली, तरी मान्सून सामान्य किंवा अधिक राहील, असं स्कायमेटनं स्पष्ट केलं आहे. देशात अतिवृष्टीची शक्यता १० टक्के असल्याचंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
या अंदाजामुळे शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला असून, खरीप हंगामासाठी यंदा चांगली परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
हॅशटॅग्स:
#मान्सून२०२५ #Skymet #RainForecast #महाराष्ट्रपाऊस #शेतकरीदिलासा #हवामान
अधिक वाचा:????????