प्रज्ञाशोध परीक्षेत श्रमिक विद्यालयाची अनन्या डोर्लेकर तालुक्यात अव्वल
८८ गुणांसह मिळवला प्रथम क्रमांक; शिवार आंबेरे परिसरात आनंदोत्सव
रत्नागिरी | संदीप शेमणकर
माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद रत्नागिरी आणि जिल्हा माध्यमिक अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विद्यार्थी प्रज्ञाशोध परीक्षा २०२४-२५ मध्ये गट क्रमांक २ (इयत्ता ८वी) साठी श्रमिक विद्यालय, शिवार आंबेरे येथील कु. अनन्या अविनाश डोर्लेकर हिने ८८ गुण मिळवत रत्नागिरी तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे.
या उल्लेखनीय यशामुळे शैक्षणिक संकुलासह पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून अनन्याचे जोरदार कौतुक करण्यात येत आहे. अभ्यासातील सातत्य, कष्ट, मार्गदर्शक शिक्षकांचे योग्य दिशादर्शन आणि पालकांचे प्रोत्साहन या यशामागील प्रमुख घटक ठरले आहेत. अनन्याला नंदकुमारजी मोहिते यांची प्रेरणा लाभली असल्याची माहिती मिळाली आहे.
मुख्याध्यापक मधुकर थुळ सर यांनी अनन्याचे विशेष अभिनंदन केले असून मार्गदर्शक शिक्षक तसेच तिच्या पालकांचेही त्यांनी कौतुक केले आहे.
या यशामुळे श्रमिक विद्यालयाची शैक्षणिक गुणवत्ता पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून अनेक पालक व विद्यार्थ्यांसाठी हे प्रेरणादायी ठरत आहे.
—
#अनन्या_डोर्लेकर #प्रज्ञाशोध_परीक्षा #श्रमिक_विद्यालय #रत्नागिरी #शैक्षणिक_यश #विद्यार्थिनीचा_गौरव #TalukaTopper #RatnagiriEducation #MaziBatmi #ratnagirivartahar
लेखक: संदीप शेमणकर
वेबसाईट: www.ratnagirivartahar.in