प्रज्ञाशोध परीक्षेत आबलोलीच्या आराध्या पवारचा झळाळता यश!
इयत्ता ६वीतील विद्यार्थिनीचा तालुक्यात द्वितीय क्रमांक
आबलोली | प्रतिनिधी – संदेश कदम
माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद रत्नागिरी आणि रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने डिसेंबर २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या विद्यार्थी प्रज्ञाशोध परीक्षा २०२४-२५ मध्ये गुहागर तालुक्यातील आबलोली येथील लोकशिक्षण मंडळ संचलित चंद्रकांत बाईत माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय इथल्या इयत्ता सहावीच्या कु. आराध्या अमोल पवार हिने इयत्ता ५वी ते ७वी गटात तालुक्यातून द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
ही परीक्षा विद्यार्थ्यांमधील गुणशक्ती ओळखून स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने त्यांना तयार करण्याच्या उद्देशाने घेतली जाते. आराध्याच्या यशामुळे विद्यालयात आनंदाचे वातावरण असून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या यशाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक डी. डी. गिरी यांनी तिचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीही उपस्थित होते
—
#आराध्या_पवार #प्रज्ञाशोध_परीक्षा #आबलोली #TalukaSecond #गुहागर_शैक्षणिक_यश #विद्यार्थिनीचा_गौरव #Pradnyashodh2025 #ratnagirivartahar #MaziBatmi
लेखक: संदेश कदम
वेबसाईट: www.ratnagirivartahar.in