सैलानी बाबांच्या यात्रेस नंदकुमार बगाडेपाटील यांची सदिच्छा भेट
हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या सैलानी बाबा मंदिरात भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती; सुविधा अपुऱ्या असल्याने भक्त नाराज

अहिल्यानगर | प्रतिनिधी – नंदकुमार बगाडेपाटील
बुलढाणा जिल्ह्यातील श्री क्षेत्र सैलानी बाबा मंदिर हे महाराष्ट्रातील हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानले जाते. या ठिकाणी चालणाऱ्या यात्रेनिमित्त अहिल्यानगर येथून नंदकुमार बगाडेपाटील आणि श्रीरामपूरचे मोहनबाबा यांनी नुकतीच सदिच्छा भेट देत दर्शन घेतले.
या वेळी बगाडेपाटील म्हणाले, “सैलानी बाबांच्या पावन स्थळी येताना समाधान वाटले. येथे कोणताही जातिभेद न करता सर्व धर्मीय भक्त एकत्र येतात आणि नवस फेडण्यासाठी बाबांचे दर्शन घेतात.” ही यात्रा जवळपास १५ दिवस चालते आणि यामध्ये महाराष्ट्रभरातून लाखो भाविक भक्त सहभागी होतात.
राज्य शासनाने पोलीस बंदोबस्ताची चोख व्यवस्था केली असली तरी, पिण्याच्या पाण्याची सुविधा अपुरी होती, त्यामुळे भाविकांना त्रास सहन करावा लागला. स्थानिक भाविकांनी शासनाचे लक्ष वेधत रस्त्याची सुधारणा आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
बुलढाणा जिल्हा हे संतांची भूमी मानले जाते. येथे संत गजानन महाराज, एकमुखी दत्त म्हणजेच जाळीची देवी या पवित्र स्थळांसह सैलानी बाबा मंदिर प्रसिद्ध आहे. स्थानिक आमदार आणि मुख्यमंत्री यांनी याकडे लक्ष देऊन भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशीही मागणी भाविकांकडून करण्यात आली.
यात्रेदरम्यान मोहनबाबा आणि त्यांच्या शिष्य मंडळीने सैलानी बाबांची मिरवणूक काढून चंद्रयान व गलप चढवले. यावेळी तुषार मोकळे, तालीम मुजावर आणि इतर भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#सैलानीबाबा #बुलढाणा #धार्मिकयात्रा #हिंदूमुस्लिमऐक्य #नंदकुमारबगाडेपाटील #मोहनबाबा #भाविकांचीमागणी #महाराष्ट्रधर्मपरंपरा