गुहागरच्या एस. के. च्या ‘तुझ्या नादान’ गाण्याचा युट्यूबवर धुमाकूळ – अवघ्या ३ दिवसात १० लाख व्ह्यूज!
शशांक कोंडविलकर यांच्या लेखणीतून साकारलेलं आणि स्नेहा महाडिकच्या आवाजात खुललेलं हे गाणं कोकणात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात गाजतंय!
आबलोली (संदेश कदम) –
गुहागर तालुक्यातील शृंगारतळी-जानवळे गावचा सुपुत्र, अष्टपैलू व्यक्तिमत्त्व शशांक सुर्यकांत कोंडविलकर उर्फ एस. के. यांच्या ‘तुझ्या नादान’ या गाण्याने युट्यूबवर जबरदस्त यश मिळवलं आहे. अवघ्या तीन दिवसांत या गाण्याने १० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळवत डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपला ठसा उमटवला आहे.
या गाण्याचे लेखन, दिग्दर्शन आणि संकल्पना स्वतः एस. के. यांनी केली आहे. स्नेहा महाडिक हिच्या गोड आवाजात सादर झालेलं हे गाणं, संगीतकार संदीप भूरे यांनी संगीतबद्ध केलं असून, चेतन गरुड आणि सिद्धेश पै यांनी दिग्दर्शक म्हणून योगदान दिलं आहे.
गाण्याच्या व्हिडीओमध्ये सॅन्ड्रीक डिसोझा आणि कांचन कोळी यांची प्रभावी अभिनय सादरीकरण विशेष लक्ष वेधून घेत आहे. टी-सिरीज या आघाडीच्या म्युझिक लेबलवर हे गाणं प्रदर्शित झालं आहे.
कोकणातील तरुण कलाकारांकडून तयार झालेलं आणि व्यावसायिक दर्जाचे हे गाणं सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत असून, प्रेक्षक आणि संगीतप्रेमी यांचं भरभरून कौतुक मिळवत आहे.
हॅशटॅग:
#तुझ्या_नादान #SKMusic #TSeriesMarathi #KonkaniTalent #GuhagarPride #MarathiSong #YouTubeHit #SnehaMahadik #SandeepBhure #SandrickDsouza #KanchanKoli #ShashankKondvilkar
फोटो