सामाजिक वनीकरण चित्रकला स्पर्धेत आर्या जानवळकर व समृद्धी आंबेकर यांचा बहुमान
वृक्षसंवर्धन संदेश देणाऱ्या स्पर्धेत पाटपन्हाळे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे यश
आबलोली (संदेश कदम) –
सामाजिक वनीकरण विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे निसर्गाविषयी जनजागृती आणि वृक्षसंवर्धनाचा संदेश देण्यासाठी आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेत पाटपन्हाळे येथील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. ही स्पर्धा दोन गटांत (इयत्ता ५वी ते ८वी व ९वी ते १०वी) घेण्यात आली होती.
प्राथमिक गट (५वी ते ८वी) मध्ये आर्या अनंत जानवळकर हिने प्रथम क्रमांक पटकावला. ओजस्वी सुधीर वासनिक याला द्वितीय, तर नेहा संदीप निवाते हिला तृतीय क्रमांक मिळाला.
उच्च गटात (९वी ते १०वी) समृद्धी सुरेश आंबेकर हिला प्रथम क्रमांक, श्रीया संतोष नागेश हिला द्वितीय, व मैथिली विनोद कदम हिला तृतीय क्रमांक प्राप्त झाला.
वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन आणि वृक्षतोडीविरोधी संदेश असलेल्या चित्रांद्वारे विद्यार्थ्यांनी सामाजिक भान दाखवले. या यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी श्री. दबडे व श्री. माळी, शाळेचे मुख्याध्यापक व्ही.डी. पाटील, पर्यवेक्षक जी.डी. नेरले आणि शिक्षकवृंद यांच्या हस्ते करण्यात आला. यांना आकर्षक चषक, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ प्रदान करण्यात आले.
या स्पर्धेतील यशामागे चित्रकला शिक्षक एस.बी. मेटकरी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी व सहभागी विद्यार्थ्यांचे पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्षा सुचिता वेल्हाळ, सचिव सुधाकर चव्हाण यांच्यासह पदाधिकारी, शिक्षकवर्ग आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.
हॅशटॅग्स:
#चित्रकला_स्पर्धा #वृक्षसंवर्धन #पाटपन्हाळे_विद्यालय #विद्यार्थी_यश #सामाजिक_वनीकरण #गुहागर

Author: Team Ratnagiri Vartahar
Official Ratnagiri vartahar Media creators