कैलास शार्दुल यांची जिल्हा नेतेपदी निवड : शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

:कैलास शार्दुल यांची जिल्हा नेतेपदी निवड : शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण

banner

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, रत्नागिरीच्या अधिवेशनात मोठा निर्णय — गुहागर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा.

गुहागर _महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, जिल्हा शाखा रत्नागिरी यांच्या कार्यकारणी सभेला आणि जिल्हा अधिवेशनाला नुकतेच चिपळूणमधील शिक्षक पतपेढीच्या सभागृहात यशस्वीरीत्या प्रारंभ झाला. या अधिवेशनात गुहागर तालुक्यातील जानवळे नं. १ शाळेचे मुख्याध्यापक कैलास शार्दुल यांची जिल्हा नेतेपदी निवड करण्यात आली. हे पद अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जाते.

कैलास शार्दुल सर हे शिक्षकप्रिय, अभ्यासू व निर्भीड व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांचा सातत्याने प्रशासनाकडे ठाम पाठपुरावा असतो. त्यांच्या या निवडीनंतर रत्नागिरी जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

गुहागर तालुक्याला जिल्हा नेतेपद बहाल होणे ही त्या भागातील शिक्षकांसाठी अभिमानाची बाब ठरली आहे. आपल्या भावना व्यक्त करताना शार्दुल सर म्हणाले, “जिल्हास्तरावर संघटनात्मक काम अत्यंत प्रामाणिकपणे, सर्व शिक्षकांना सोबत घेऊन करणार आहे. सर्वांनी सहकार्य करावे.”

त्यांच्या निवडीने शिक्षक संघटनेमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून जिल्हास्तरावरील प्रश्न मार्गी लागतील, असा विश्वास सर्व शिक्षक वर्ग व्यक्त करत आहेत.


#कैलासशार्दुल #शिक्षकसंघ #रत्नागिरी #गुहागर #शिक्षकअधिवेशन #शिक्षकनिवड #शिक्षकसमस्या #PrimaryTeachersUnion #RatnagiriNew

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators

Leave a Comment

आणखी वाचा...