एक समाज, एक संघ” स्पर्धेत आमदार भास्करशेठ जाधव यांची विनोदी चौकार-षटकार फटकेबाजी!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

एक समाज, एक संघ” स्पर्धेत आमदार भास्करशेठ जाधव यांची विनोदी चौकार-षटकार फटकेबाजी!

मनसेच्या उपक्रमाचे कौतुक करत गुहागर आमदारांची दिलखुलास उपस्थिती; प्रमोद गांधी यांच्या उपक्रमाला दिले खुले समर्थन.

Bhaskar jadhav
एक समाज, एक संघ” स्पर्धेत आमदार भास्करशेठ जाधव यांची विनोदी चौकार-षटकार फटकेबाजी!

आबलोली | प्रतिनिधी –संदेश कदम 
गुहागर विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित “एक समाज, एक संघ – समाज एकता मनसे चषक २०२५” या आगळ्या क्रिकेट स्पर्धेचा रंगतदार शुभारंभ झाला असून, यावेळी व्यासपीठावर उपस्थित आमदार भास्करशेठ जाधव यांनी त्यांच्या विनोदी शैलीतील मनोगताने उपस्थितांची मनं जिंकली.

“मी प्रमोद गांधी यांच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक करायला आलो आहे. चांगल्या कामाला पाठिंबा देणं हे आमचं काम आहे,” असं सांगत त्यांनी आपल्या खास शैलीत विनोदाची चौकार-षटकार फटकेबाजी केली. “प्रमोद गांधी यांनी माझ्यावर छत्री धरली, म्हणजे मी त्यांच्या छत्रीखाली गेलो. आता कितीही वादळं आली, तरी मला चिंता नाही!” अशा शब्दांनी उपस्थितांमध्ये हास्याची लाट उसळली.

या वेळी बोलताना आमदार जाधव म्हणाले, “एक समाज, एक संघ” या नावातून सामाजिक ऐक्याचा संदेश दिला गेला आहे. कुठल्याही एकाच समाजापुरती स्पर्धा न ठेवता, १२ वेगवेगळ्या समाजांचे १२ संघ घेऊन सर्वांसाठी ही स्पर्धा खुली करण्यात आली आहे, ही कल्पकता वाखाणण्याजोगी आहे. मी या उपक्रमाला नेहमीच साथ देईन.”

स्पर्धेचे प्रमुख आयोजक प्रमोद गांधी यांचा आमदार जाधव यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ व मनसेची छत्री देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी आमदारांचे स्वयंसहाय्यक संतोष तांदळे यांचा सत्कार मनसेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांच्या हस्ते करण्यात आला.

उपस्थित मान्यवरांमध्ये मनसेचे गुहागर तालुका अध्यक्ष सुनिल हळदणकर, पंचायत समितीचे माजी सभापती व कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन सुरेश (दादा) सावंत, माजी सभापती सुनिल पवार, मराठा समाजाचे तालुका अध्यक्ष भगवानराव कदम, सरपंच विजय तेलगडे, साबीर साल्हे, उपसरपंच आसिम साल्हे, पिंट्या संसारे, मामा शिर्के, सचिन जाधव, ममताजभाई ठाकूर यांचा समावेश होता.

हॅशटॅग्स:
#मनसेचषक२०२५ #एकसमाजएकसंघ #भास्करशेठजाधव #गुहागर #मनसे #क्रिकेटस्पर्धा #समाजएकता

फोटो

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.

Leave a Comment

आणखी वाचा...