:रत्नागिरीत स्मार्ट सिटी योजनेतंर्गत दामले विद्यालयाच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन
डॉ. उदय सामंत यांचा विश्वास – “रत्नागिरी बदललंय, येत्या दोन वर्षांत स्मार्ट शहर म्हणून उभं राहणार”
रत्नागिरी – स्मार्ट सिटी योजनेच्या अनुषंगाने रत्नागिरी नगरपरिषदेच्या दामले विद्यालयाच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते आज पार पडले. यावेळी त्यांनी रत्नागिरीच्या विकासाविषयी ठाम भूमिका मांडत सांगितले, की “रत्नागिरी बदलतंय… बदललंय… आणि पुढील दोन वर्षांत हे शहर स्मार्ट शहर म्हणून नावारूपाला येईल.”
१५ कोटी ३८ लाखांच्या निधीतून इमारत उभारणी
एमआयडीसीच्या विशेष निधीमधून ही नवी इमारत उभारण्यात येणार असून यासाठी १५ कोटी ३८ लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. खासगी शाळांपेक्षाही अधिक चांगली सुविधा देणारी ही इमारत आदर्श ठरणार असल्याचे डॉ. सामंत यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमास मान्यवरांची उपस्थिती
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, डाएटचे प्राचार्य सुशील शिवलकर, प्रांताधिकारी जीवन देसाई, तहसिलदार राजाराम म्हात्रे, मुख्याधिकारी तुषार बाबर, शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार साळवी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
जीडीपी वाढीतील आघाडीवर रत्नागिरी
“रत्नागिरी पर्यटन जिल्हा असून येथे हजारो पर्यटक भेट देतात. येथील हॉटेल्स सदैव फुल असतात. त्यामुळे भविष्यात जीडीपी वाढीतील राज्यातील अग्रगण्य जिल्ह्यांमध्ये रत्नागिरीचा समावेश होईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अंमली पदार्थविरोधी ठाम भूमिका
कार्यक्रमात बोलताना डॉ. सामंत यांनी अंमली पदार्थांविरोधात कठोर भूमिका घेत तीन महिन्यांत रत्नागिरी अंमली पदार्थ मुक्त होईल, असे आश्वासन दिले. अशा प्रकरणात हस्तक्षेप करणाऱ्या पुढाऱ्यांची नावे पोलिसांनी पत्रकार परिषदेत जाहीर करावीत, असेही ते म्हणाले.
पालक, शिक्षक, विद्यार्थी यांचा मोठा प्रतिसाद
कार्यक्रमाला पालक, शिक्षक, तसेच आजी-माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#RatnagiriSmartCity #DamleVidyalaya #UdaySamant #MIDC #SmartCityMission #RatnagiriDevelopment #GDPGrowth #DrugFreeDistrict #RatnagiriNews
फोटो