“गतस्मृतींची गजबज” पुस्तकाचे प्रकाशन संपन्न
समाजशिक्षक राष्ट्रपाल सावंत यांच्या कार्याचा गौरव; समतेचा संदेश देणारा कार्यक्रम
तळवली (मंगेश जाधव):
“गतस्मृतींची गजबज” हे राष्ट्रपाल सावंत लिखित पुस्तक केवळ साहित्य नाही, तर मूल्यशिक्षणाचा जिवंत दस्तऐवज आहे, असे गौरवोद्गार अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी रविवारी चिपळूणमध्ये झालेल्या प्रकाशन सोहळ्यात व्यक्त केले. शिक्षक पतपेढीच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय आणि कोकण मराठी साहित्य परिषद शाखा चिपळूण यांच्या वतीने करण्यात आले होते.
या प्रकाशन समारंभाचे अध्यक्षस्थान कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे यांनी भूषविले. यावेळी संस्कृती प्रकाशन पुणेच्या सुनिताराजे पवार यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले. डॉ. चोरगे यांनी राष्ट्रपाल सावंत यांचे साहित्य हे वास्तवाला भिडणारे असून त्यांनी शंभर पुस्तके लिहावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमात प्रा. जोशी म्हणाले, “हे पुस्तक शाळेत रोज एक प्रकरण वाचले, तरी स्वतंत्र मूल्यशिक्षणाची गरज भासत नाही. सावंत हे केवळ शिक्षक नसून समाज शिक्षक आहेत.”
या कार्यक्रमात प्रकाश देशपांडे, अरुण इंगवले, आसावरी जोशी, शौकत मुकादम, विठोबा पवार, अप्पा जाधव, अनिलकुमार जोशी, निलाताई जाधव, मंगेश पेढांबकर, राजेंद्र आरेकर, सुनिल खेडेकर, आनंद घोडके, संतोष गोणबरे, विनय माळी, श्रीकृष्ण शिंदे, धनंजय चितळे, शशिकांत सकाळा, चंद्रकांत सावंत, खालिद पटाईत यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंजली बऱ्ये यांनी केले. उपस्थितांचे मनोगत ऐकताना अनेकांच्या भावना उफाळून आल्या. हा समारंभ समतेचा खरा अर्थ पटवून देणारा ठरला.
—
#गतस्मृतीचीगजबज #राष्ट्रपालसावंत #समाजशिक्षक #कोकणसाहित्य #चिपळूणसंस्कृती #मराठीपुस्तकप्रकाशन #KonkanLiterature #ValueEducation #MarathiBooks