वेलदूर नवानगर शाळेत सातवीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ भावनिक वातावरणात साजरा
विद्यार्थ्यांच्या मनोगतातून उभे राहिले आठवणींचे भावविश्व; टोप भेट देऊन दिला शाळेप्रती कृतज्ञतेचा संदेश
गुहागर – जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर नवानगर मराठी शाळेमध्ये इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. विशेष म्हणजे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वतः सातवीतील विद्यार्थी संस्कार कल्पेश रोहिलकर याने भूषवले. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने झाली.
या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा शिल्पाताई कोळथरकर, माजी सरपंच नंदाशेठ रोहिलकर, शिक्षणतज्ञ शंकर कोळथरकर, सामाजिक कार्यकर्ते मनोज पावसकर, मुख्याध्यापक डॉ. मनोज पाटील, उपशिक्षिका अंजली मुद्दमवार, सुषमा गायकवाड, अफसाना मुल्ला यांच्यासह व्यवस्थापन समितीच्या सदस्य दीपिका वरवटकर, दिपाली रोहीलकर, वंशिका आंबेरकर, सुहानी नाटेकर, प्रियाणी रोहीलकर, सुरक्षा रोहिलकर, दुर्वा कोळथरकर, निशा जाधव, रीना खडपकर व देवयानी कोळथरकर उपस्थित होते.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनीही आपली मनोगते मांडली. साई नाटेकर, दक्ष रोहीलकर, आरोही रोहीलकर, साई नाईक, अन्वी जांभारकर यांच्यासह आर्या नाटेकर, अर्णवी नाटेकर आणि संस्कार रोहिलकर यांच्या भावस्पर्शी भाषणांनी उपस्थितांचे डोळे पाणावले.
सामाजिक कार्यकर्ते पावसकर, कोळथरकर सर आणि माजी सरपंच रोहिलकर यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापक डॉ. पाटील सरांनी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी शाळेसाठी पोषण आहारासाठी लागणारा टोप भेट देत शाळेप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमात जेवणाचीही विशेष व्यवस्था करण्यात आली होती. सुवर्णा कोळथरकर, विशाखा नाटेकर आणि समिती सदस्यांनी स्वादिष्ट भोजन तयार केले. सूत्रसंचालन सुषमा गायकवाड यांनी, प्रास्ताविक अंजली मुद्दमवार आणि आभार प्रदर्शन अफसाना मुल्ला यांनी केले.
हॅशटॅग्स:
#वेलदूरनवानगर #सदिच्छासमारंभ #इयत्ता७वी #विद्यार्थीदिन #शाळा #ZPSchool #RatnagiriNews #मराठीबातमी