गोरेगाव पश्चिमच्या न्यु हनुमान नगरमध्ये भीम जयंती उत्साहात साजरी

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

गोरेगाव पश्चिमच्या न्यु हनुमान नगरमध्ये भीम जयंती उत्साहात साजरी

 

नमो सुराद्य’ संगीतमय कार्यक्रमाने सांगता; धम्मध्वजारोहण, सत्कार आणि मार्गदर्शन सत्रात मान्यवरांची उपस्थिती

 

नवी मुंबई (मंगेश जाधव) –

गोरेगाव पश्चिममधील न्यु हनुमान नगर येथे बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र. ४३४, भिमाई महिला मंडळ, धम्मदिप तरुण मंडळ आणि न्यु हनुमान नगर रहिवासी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३४ वा जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिनेश लोखंडे होते.

 

यावेळी गोरेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक शेखर कदम यांच्या हस्ते धम्मध्वजारोहण झाले. कार्यक्रमात मान्यवरांचे जाहीर सत्कार करण्यात आले व विविध मार्गदर्शनपर भाषणांनी उपस्थितांना प्रेरणा मिळाली.

 

कार्यक्रमाला पोलीस उपनिरीक्षक किशोर जाधव, माजी नगरसेवक समीर देसाई, न्यू हनुमान नगर विकासक अजय विचारे, समाजसेविका लक्ष्मी भाटिया, समाजसेवक सुशील चव्हाण, बहुजन पंचायत समितीचे सरचिटणीस राजेश घाडगे, शाखा क्र. ४३४ चे चिटणीस अनिल हळदे, विजय पवार, रवींद्र गमरे, चंद्रमणी मोहिते, माजी अध्यक्ष यशवंत जाधव तसेच भिमाई महिला मंडळाच्या अध्यक्षा संगीता धोत्रे, चिटणीस मनीषा लोखंडे, भक्ती जाधव, रोशनी गमरे, वंदना गायकवाड यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

कार्यक्रमाच्या शेवटी शैलेश मोहिते यांच्या संकल्पनेतून साकारलेला ‘नमो सुराद्य’ हा संगीतमय कार्यक्रम सादर करण्यात आला. या यशस्वी आयोजनासाठी बौद्धजन पंचायत समिती, भिमाई महिला मंडळ, त्यांच्या मार्गदर्शक बंधू-भगिनी आणि न्यु हनुमान नगरमधील सर्व रहिवाशांचे विशेष सहकार्य लाभले.

 

हॅशटॅग्स:

#भीमजयंती२०२५ #गोरेगावपश्चिम #न्युहनुमाननगर #बाबासाहेबआंबेडकर #धम्मचळवळ #AmbedkarJayanti #MumbaiNews #MarathiNews

 

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.

bhaskr

Leave a Comment

आणखी वाचा...