आपले सरकार’ पोर्टलवर दिरंगाई केली तर विभागप्रमुखांना दररोज १००० रुपये दंड!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

आपले सरकार’ पोर्टलवर दिरंगाई केली तर विभागप्रमुखांना दररोज १००० रुपये दंड!

banner

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णायक आदेश; नागरिकांना वेळेत सेवा मिळवून देण्यासाठी पाऊल

 

मुंबई : श्री निलेश रहाटे

सामान्य नागरिकांना घरबसल्या शासकीय सेवा मिळाव्यात यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘आपले सरकार’ पोर्टलवर सेवा देण्यात प्रशासनाकडून होणाऱ्या दिरंगाईला चाप बसणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विभागप्रमुखांवर दररोज १००० रुपयांचा दंड आकारण्याचे आदेश दिले आहेत.

 

राज्य शासनाने सेवा हक्क अधिनियमांतर्गत १०२७ सेवा अधिसूचित केल्या असून, त्यापैकी ५२७ सेवा सध्या ‘आपले सरकार’ पोर्टलवर उपलब्ध आहेत. उर्वरित सेवा लवकरच उपलब्ध करून देण्याचे आदेशही संबंधित विभागांना देण्यात आले आहेत.

 

या निर्णयामुळे नागरिकांच्या तक्रारींचा वेळेत निपटारा होईल आणि सेवा कार्यक्षमतेने उपलब्ध होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शासकीय यंत्रणेकडून वेळेवर सेवा न मिळाल्यास विभागप्रमुखांना दररोजचा आर्थिक फटका बसणार आहे.

 

#आपलेसरकार #सेवाहक्कअधिनियम #DevendraFadnavis #महाराष्ट्रशासन #ईगव्हर्नन्स #GovtServicesOnline #DigitalMaharashtra

 

 

Nilesh Rahate
Author: Nilesh Rahate

🔴 निलेश रहाटे 🔴 मिडिया प्रतिनिधि - रत्नागिरी वार्ताहर. ता. जिल्हा - रत्नागिरी

Leave a Comment

आणखी वाचा...