कुणबी समाज नेते निसर्गवासी नंदकुमार मोहिते सर यांना आदरांजली; २० एप्रिलला मुलुंड पूर्व येथे सभा
कुणबी समाजोन्नती संघ व विविध संघटनांचा पुढाकार; समाजात निर्माण झालेल्या पोकळीत श्रद्धेची भर
आबलोली (संदेश कदम) –
माजी जिल्हा परिषद सदस्य, कुळ कायद्याचे अभ्यासक आणि कुणबी समाजाचे मार्गदर्शक नंदकुमारजी मोहिते सर यांचे ६ मार्च २०२५ रोजी दु:खद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण कुणबी समाज, कुटुंबीय आणि हितचिंतकांमध्ये शोककळा पसरली होती. त्यांच्या जाण्याने समाजात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
नंदकुमार मोहिते सर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कुणबी समाजोन्नती संघ मुंबई यांच्या पुढाकाराने आणि कुणबी एकीकरण समीती महाराष्ट्र राज्य, केसीसीआय, बळीराज सेना व बहूजन विकास आघाडी यांच्या सहकार्याने आदरांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही सभा रविवार, दिनांक २० एप्रिल २०२५ रोजी संध्याकाळी ४ वाजता त्रिमूर्ती सभागृह, कुणबी विद्यार्थी वसतिगृह, मुलुंड (पूर्व) येथे होणार आहे.
या सभेला सर्व आमंत्रित संस्था, समाजबांधव, हितचिंतक आणि मोहिते सर यांचे अनुयायी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. ही श्रद्धांजली सभा मोहिते सरांच्या कार्याचा सन्मान करण्याची एक संधी ठरणार आहे.
हॅशटॅग:
#NandkumarMohite #कुणबीसमाज #AdarangaliSabha #MulundEvent #BahujanVikasAghadi #KCCAI #BalirajSena #TributeMeeting #Kulanayak