जनता दरबारात ९०% तक्रारींचा जागेवरच निकाल; पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांचा सक्रिय हस्तक्षेप
जिल्हा नियोजन समिती सभागृहात तब्बल तीन तास दरबार; अधिकारी, जनता आणि जनतेच्या समस्या एकाच व्यासपीठावर
रत्नागिरी –
जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी जिल्हा नियोजन समिती सभागृहात घेतलेल्या जनता दरबाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध विभागांकडून आलेल्या जवळपास १२३ अर्जांपैकी तब्बल ९० टक्के तक्रारी जागेवरच निकाली काढल्या गेल्या. जिल्हा प्रशासनाच्या नियोजनामुळे आणि अधिकाऱ्यांच्या सक्रिय सहभागामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.
या दरम्यान पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, “काही अधिकारी वगळता बहुतांश अधिकारी सक्षमपणे काम करत असून त्यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक आहे. मात्र, कोणतेही काम जनतेच्या हितापेक्षा मोठे नसते. अधिकाऱ्यांनी शिस्तबद्धपणे काम करावे.”
दरबारासाठी प्रशासनाने तळमजल्यावर नोंदणी कक्ष, टोकन सुविधा व दुसऱ्या मजल्यावर प्रतिक्षा कक्षाची उत्तम व्यवस्था केली होती. जवळपास तीन तास चाललेल्या या दरबारात रस्ते, पाणीपुरवठा, वीज, प्रधानमंत्री आवास योजना, बीएसएनएल टॉवर, माजी सैनिक गृहनिर्माण भूखंड, व्यायामशाळा, शाळा सुरू करणे, शॉर्ट सर्किट नुकसान भरपाई अशा अनेक तक्रारी घेऊन जनता उपस्थित होती.
डॉ. सामंत यांनी प्रशासनाला दिलेल्या सूचनांमध्ये महत्त्वाच्या घोषणा पुढीलप्रमाणे:
ग्रोव्हियन्स बंधाऱ्यासाठी १४३ कोटी मंजूर; काम मार्गी लावा
रत्नागिरीत २ रोप वे; एका रोपवेसाठी जागा पाहणी तातडीने करावी
राजीवडा रस्त्याचे काम स्थानिकांच्या विश्वासात घेऊन सुरू करावे
राजापूर (राजिवडे) व संगमेश्वर (निवदे) येथे बीएसएनएल टॉवर तातडीने सुरू करावेत
माजी सैनिक विश्रामगृह नुतनीकरणासाठी २५ लाखांचा निधी जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर करावा
शहरातील ३० उद्याने व व्यायामशाळांचा विकास स्मार्ट सिटी अंतर्गत
पालकमंत्री सामंत यांनी स्पष्ट केले की दर महिन्याला जनता दरबार होणार असून प्रलंबित प्रश्नांना पुढच्या दरबारात निकाली काढले जाईल.
आजच्या दरबारात विविध ग्रामपंचायतीचे सरपंच, महिला शिक्षिका, ग्रामस्थ आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हॅशटॅग्स:
#PalakmantriUdaySamant #JanataDarbarRatnagiri #PublicGrievanceRedressal #SmartCityProjects #BSNLDevelopment #RatnagiriNews #JilhaNiyojanSamiti #BalirajRashtraVikas