पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांची महाडायलिसिस केंद्राला भेट
पाली ग्रामीण रुग्णालयात नव्याने सुरू झालेल्या मोफत डायलिसिस सेवांची पाहणी; रुग्णांसाठी जीवनदायी सुविधा – सामंत
तळवली (मंगेश जाधव) – रायगडचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी पाली ग्रामीण रुग्णालयातील नव्याने सुरू झालेल्या महाडायलिसिस केंद्राला भेट देत सुविधांचा आढावा घेतला. ग्रामीण भागातील रुग्णांना मोफत डायलिसिस सेवा मिळणे ही एक मोठी आरोग्यपूर्ण सुविधा असून, ती जीवनदायी ठरत असल्याचे सामंत यांनी सांगितले.
या पाहणीदरम्यान त्यांनी डायलिसिस केंद्रातील डॉक्टर, कर्मचारी आणि तंत्रज्ञांशी सविस्तर चर्चा करत त्यांच्या कार्यप्रणालीची माहिती घेतली. त्यांनी रुग्णसेवेमधील सुधारणा, सुविधा आणि सेवा गुणवत्तेचा आढावा घेत ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेसाठी हे केंद्र महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, उपविभागीय अधिकारी जीवन देसाई, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक तथा वैद्यकीय अधीक्षक डॉ. विकास कुमरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन साळुंखे तसेच ग्रामीण रुग्णालय पालीचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हॅशटॅग्स:
#उदयसामंत #महाडायलिसिसकेंद्र #पालीग्रामीणरुग्णालय #रायगडआरोग्य #मोफतडायलिसिस #आरोग्यसेवा #RatangiriVartaHar #MarathiNews