हिंदू एकता आंदोलन पक्षाचा राज्यस्तरीय मेळावा शिर्डीत संपन्न; नव्या कार्यकारिणीची घोषणा
रामसिंग बावरी यांची राष्ट्रपती राजवटीची मागणी; काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश
शिर्डी (प्रतिनिधी नंदकुमार बगाडे पाटील) – हिंदू एकता आंदोलन पक्षाचा राज्यस्तरीय मेळावा गुरुवारी, १७ एप्रिल २०२५ रोजी शिर्डीत मोठ्या उत्साहात पार पडला. या वेळी राज्यातील विविध जिल्ह्यांमधून आलेले पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुदर्शन आण्णा शितोळे यांनी या मेळाव्याची माहिती दिली.
या मेळाव्याचे प्रमुख मार्गदर्शक पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंग बावरी होते. त्यांनी पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी सांगितले की, “वक्फ बोर्ड कायदा लागू झाल्यानंतर पश्चिम बंगालमधील हिंदूंवर हल्ले होत असून त्यांच्या मालमत्तेची लूट सुरू आहे. त्यामुळे तिथे राष्ट्रपती राजवट लागू करणे गरजेचे आहे.”
बावरी यांनी देशात सर्व धर्मियांना सक्तीचे कुटुंब नियोजन लागू करावे आणि समान नागरी कायदा लागू करण्याची मागणीही यावेळी केली. त्यांनी स्पष्ट केले की हिंदू एकता आंदोलन संघटना व पक्ष एकच असून सुदर्शन शितोळे हेच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहेत. पुढील अधिवेशने कोल्हापूर व सांगली येथे होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रदेशाध्यक्ष शितोळे म्हणाले, “शिर्डी हे अधिवेशनांचे पवित्र केंद्र बनले आहे. येणाऱ्या स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये हिंदुत्वाचा खरा प्रतिनिधी हिंदू एकता आंदोलन पक्ष ठरेल.” त्यांनी पक्षाच्या ३० वर्षांच्या आंदोलनांचा आढावा घेतला आणि कार्यकारिणीत युवकांना संधी दिल्याचे नमूद केले.
या मेळाव्यात नव्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यात सांगली, पुणे, धुळे, नाशिक, जळगाव, संभाजीनगर आदी भागांतील प्रमुख पदाधिकाऱ्यांची नियुक्ती झाली. उल्लेखनीय निवडी पुढीलप्रमाणे:
अॅड. बाळासाहेब वाघमोडे – सांगली प्रदेश सरचिटणीस
राहुल मोरे – सांगली प्रदेश संघटक
दीपक ढवळे – मिरज-सांगली प्रदेश सचिव
संतोष जगताप – महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष
श्रीकांत कापसे – पुणे जिल्हाध्यक्ष
अजय माळी – धुळे युवा अध्यक्ष
प्रियंका अहिरराव – महिला आघाडी नाशिक प्रमुख
किशोर बागमार – नाशिक जिल्हाध्यक्ष
मनोज मराठे – धुळे जिल्हाध्यक्ष व नाशिक शहर संघटक
अनिल देवकर – जळगाव जिल्हाप्रमुख
चंद्रकांत सोनवणे – संभाजीनगर जिल्हाप्रमुख
सोमनाथ येंदे – नाशिक जिल्हा उपाध्यक्ष
या वेळी पदाधिकाऱ्यांचा शाल व ट्रॉफीद्वारे गौरव करण्यात आला. सामाजिक कार्याबद्दल डॉ. रवींद्र कुटे यांचाही सन्मान करण्यात आला.
काँग्रेसचे पदाधिकारी संतोष लांडे आणि साकरीचे माजी सरपंच दिलीप खैरनार यांनी हिंदू एकता आंदोलन पक्षात प्रवेश करून उपस्थितांची दाद मिळवली.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी बी.एम. पवार, विजय जगताप, मनोहर बागुल, सोपानराव पागिरे, नंदकुमार बगाडे, दत्तात्रय मंडलिक, वसंत गायकवाड, अनिल छाबडा, शिवाजी फोफसे, अविनोश कनगरे, अशोक तनपुरे आदी पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
हॅशटॅग्स:
#हिंदूएकताआंदोलन #शिर्डीअधिवेशन #रामसिंगबावरी #समाननागरीकायदा #हिंदुत्वराजकारण #मराठीबातम्या #राज्यस्तरीयमेळावा #नवीनकार्यकारिणी #RatnagiriVartaHar