विधा वडके हिचे मंथन परीक्षेत उज्वल यश; राज्य गुणवत्ता यादीत २५ वा क्रमांक

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

विधा वडके हिचे मंथन परीक्षेत उज्वल यश; राज्य गुणवत्ता यादीत २५ वा क्रमांक

banner

 

सांगमेश्वर तालुक्यातील कोसुम्ब रामवाडी शाळेतील विद्यार्थिनीची घवघवीत कामगिरी; ब्राँझ पदकाने देखील सन्मान

तळवली (मंगेश जाधव): संगमेश्वर तालुक्यातील सांगवे केंद्रातील जिल्हा परिषद शाळा कोसुम्ब रामवाडी इथं इयत्ता तिसरीत शिक्षण घेत असलेली कु. विधा संदीप वडके हिने मंथन परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवले आहे. तिच्या या यशाबद्दल परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 

विधा हिने राज्य गुणवत्ता यादीत २५ वा, जिल्हा आणि विभागीय यादीत १८ वा, तसेच केंद्र गुणवत्ता यादीत दुसरा क्रमांक पटकावला आहे. अभ्यासू, शिस्तबद्ध आणि वाचनाची आवड असलेली विधा ही एक होतकरू विद्यार्थिनी असून, शालेय अभ्यासासोबतच बाह्य परीक्षांचे नियोजनबद्ध अध्ययन करून तिने हे यश मिळवले.

 

याचबरोबर, बी. डी. एस. परीक्षेत ८५% गुण मिळवत तिने ब्राँझ पदक देखील मिळवले आहे. तिच्या यशामागे शिक्षक संजय बोडके, निवृत्त सौ. मोघे मॅडम आणि सौ. गोपाळ मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

 

हॅशटॅग्स:

#विधावडके #मंथनपरीक्षा #शैक्षणिकयश #सांगमेश्वर #रत्नागिरी #KosumbRamwadi #ZPschoolSuccess #TalukaPride

 

 

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators

Leave a Comment

आणखी वाचा...