जलव्यवस्थापनात प्रभावी कार्यवाहीचे निर्देश : जिल्हाधिकारी देवेंदर सिंह यांचे आवाहन

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

जलव्यवस्थापनात प्रभावी कार्यवाहीचे निर्देश : जिल्हाधिकारी देवेंदर सिंह यांचे आवाहन

 

banner

जलव्यवस्थापन कृती पंधरवडा 2025 अंतर्गत स्वच्छता, जलपुनर्भरण, कालवा सफाई आणि शेतकरी संवाद यावर भर

 

रत्नागिरी : जलव्यवस्थापन कृती पंधरवडा 2025 अंतर्गत जलसंपदेशी संबंधित सर्व क्षेत्रांमध्ये अधिक प्रभावीपणे काम करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिले. कालवा साफसफाई, जलपुनर्भरण, स्वच्छ कार्यालय उपक्रम यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा, तसेच प्रलंबित भूसंपादनाची कामे जलसंपदा विभागाने मार्गी लावावीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झालेल्या या मार्गदर्शन सत्रात अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, कार्यकारी अभियंता गणेश सलगर, कार्यकारी अभियंता विवेक सोनार यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

 

श्री. सिंह म्हणाले, “100 दिवस कृती आराखडा अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तीनही इमारतीतील सर्व कार्यालयांना भेट द्यावी. स्वच्छ सुंदर माझे कार्यालय उपक्रमांतर्गत कार्यालयांची दररोज स्वच्छता होत आहे का, हे तपासावे. माहिती अधिकार व अन्य तक्रारींचे निरसन शून्याच्या आसपास ठेवावे.”

 

ते पुढे म्हणाले, “कालवा सफाईसारखे उपक्रम स्वतःहून राबवावेत, आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांच्या समवेत मार्गदर्शन सत्र घ्यावे. पाणी वापर संस्था सक्षमीकरणावर कार्यशाळा आयोजित करावी. शेतकरी पाणी वापर संस्थांशी नियमित संवाद ठेवावा.”

 

जलव्यवस्थापन कृती पंधरवड्यातून विभागीय कार्यक्षमता आणि लोकसहभाग वाढवण्यावर भर दिला जात असून, जिल्ह्यातील जलस्रोतांचे प्रभावी व्यवस्थापन याकरिता प्रशासन सज्ज असल्याचे या बैठकीतून स्पष्ट झाले.

 

हॅशटॅग्स:

#RatnagiriNews #Jalvyavasthapan2025 #DevenderSingh #WaterManagement #CanalCleaning #SwachhOffice #FarmersDialogue #JalSampadaVibhag #MaharashtraAdministration

 

 

 

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators

Leave a Comment

आणखी वाचा...


What do you like about this page?

0 / 400