राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णयांची मालिका! स्मारक, महामार्ग, न्यायालये, मत्स्य व्यवसायासाठी मोठे निर्णय

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णयांची मालिका!

स्मारक, महामार्ग, न्यायालये, मत्स्य व्यवसायासाठी मोठे निर्णय

 

banner

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह मंत्रीमंडळ उपस्थित; मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली निर्णय

 

मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आज विविध क्षेत्रातील महत्वाचे निर्णय घेण्यात आले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे यांच्यासह अन्य मंत्रिमंडळ सदस्य उपस्थित होते.

ठळक निर्णय (संक्षिप्त रूपात):

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक व महिला प्रशिक्षण केंद्र, सातारा

स्मारकासाठी 142.60 कोटी तर प्रशिक्षण केंद्रासाठी 67.17 लाखांची मंजूरी.

गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पासाठी सुधारित मान्यता

25,972.69 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली.

महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार होणार

राज्यातील कामगार कायद्यात सुधारणा केली जाणार.

कंत्राटी विधी अधिकार्‍यांचे मानधन वाढले

35,000 ऐवजी आता 50,000 रुपये मानधन मिळणार.

अतिरिक्त व जलदगती न्यायालयांना मुदतवाढ

16 अतिरिक्त न्यायालये व 23 जलदगती न्यायालयांना आणखी 2 वर्षे मुदतवाढ.

मत्स्य व्यवसायाला कृषी समान दर्जा

सवलतीसह पायाभूत सुविधा उपलब्ध होणार.

झोपडपट्टी पुनर्वसन धोरणात सुधारणा

घरांच्या निर्मिती व वितरण प्रक्रियेत बदल.

पुण्यात चार व सहा पदरी महामार्ग तयार होणार

तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गावरील मोठा निर्णय.

याच बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘आपलं मंत्रालय – एक सुसंवाद’ तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ‘2025 सर्क्युलर इकॉनॉमी डायरेक्टरी महाराष्ट्र’ या पुस्तिकांचे प्रकाशन करण्यात आले.

 

#मंत्रिमंडळबैठक #देवेंद्रफडणवीस #एकनाथशिंदे #अजितपवार #महाराष्ट्रनिर्णय #मच्छीमारी #महामार्ग #स्मारकनिर्मिती #न्यायालय #कामगारसंहिता

 

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators

Leave a Comment

आणखी वाचा...