पाक एअरस्पेस नाकारून मोदी थेट दिल्लीत; भारताच्या ‘मोठ्या’ कारवाईचे 4 स्पष्ट संकेत!
पेहेलगाम हल्ल्यानंतर भारताच्या हालचालींनी पाकिस्तानमध्ये खळबळ, मोदींच्या निर्णयाने दिला थेट इशारा
जम्मू-काश्मीरमधील पेहेलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात सुरक्षेसंबंधित घडामोडी वेगाने घडत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियातून परतताना पाकिस्तानी हवाई क्षेत्राचा वापर न करता दुसऱ्या मार्गाने थेट दिल्लीत दाखल झाले. त्यांच्या या निर्णयाला पाकिस्तानसाठी थेट इशारा मानले जात आहे.
या घडामोडींमध्ये चार मोठे संकेत स्पष्ट होत आहेत:
- गृहमंत्री अमित शाह तातडीने काश्मीरमध्ये
त्यांनी एलजी मनोज सिन्हा व लष्करी अधिकाऱ्यांशी बैठक घेतली. “कोणालाही सोडणार नाही,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे. - पंतप्रधानांचा अचानक परत भारतात प्रवेश
सौदी दौरा अर्धवट सोडून मोदी थेट दिल्लीमध्ये परतले. पाकिस्तानी एअरस्पेसचा वापर न करण्याचा निर्णय म्हणजे पाकिस्तानला स्पष्ट संदेश आहे. - कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीची बैठक
संरक्षण विषयावर निर्णय घेणाऱ्या या उच्चस्तरीय समितीची बैठक पंतप्रधान मोदी घेणार आहेत. यात कारवाईसंदर्भात मोठे निर्णय अपेक्षित आहेत. - तीनही सैन्य प्रमुख सज्ज
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी घेतलेल्या बैठकीत सर्व सैन्य प्रमुखांनी कारवाईसाठी तयार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
याआधी 2016 आणि 2019 मध्ये उरी आणि पुलवामा हल्ल्यांनंतर भारताने अनुक्रमे सर्जिकल स्ट्राइक आणि एअर स्ट्राइक केले होते. या पार्श्वभूमीवर भारताकडून पुन्हा कठोर पावलं उचलली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, पाकिस्तानमध्येही घबराट पसरली आहे. माजी परराष्ट्र मंत्री फवाद हुसैन आणि संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी तडजोडीची भाषा बोलायला सुरुवात केली आहे. सॅटेलाईट रिपोर्टनुसार पाकिस्तानने सीमेवर आपली एअरफोर्स सक्रीय केली आहे.
#Modi #IndiaVsPakistan #PahalgamAttack #SurgicalStrike #AirStrike #PMModi #AmitShah #Kashmir #BreakingNews #RatnagiriVartaHar