तवसाळ पंचक्रोशीच्या ग्रामदैवतांवर भक्तीमय गीताची निर्मिती – “श्री देवी महामाई सोनसाखळी” चा महिमा आता गीतरूपात
सप्तरंगी कला मंचच्या संकल्पनेतून साकारलेले गीत – स्थानिक कलाकारांचा अभिमानास्पद सहभाग
गाण्याचे बोल – “तवसाळ गावच आई, रक्षण महामाई करी”
गुहागर (सुजित सुर्वे) तालुक्यातील तवसाळ पंचक्रोशीतील ग्रामदैवत आणि स्थानिकांची आराध्य दैवत श्री देवी महामाई सोनसाखळी हिचा अद्वितीय महिमा, आता भक्तीमय गीताच्या रूपात रसिकांसमोर येत आहे. गावाची सांस्कृतिक ओळख, माहेरवाशिणींची श्रद्धा आणि ग्रामदैवतांवरील निस्सीम भक्ती यांचे भावपूर्ण दर्शन या गीतातून घडते.
या गीताची संकल्पना सचिन कुरटे यांची असून, निर्मिती मंगेश कुळये आणि गणेश घेवडे यांनी केली आहे. गीताचे लेखन, संगीत व गायन हे श्री. सुनिल घेवडे यांनी केले आहे. ते सप्तरंगी कला मंचचे अध्यक्षही आहेत. या गीताच्या माध्यमातून तवसाळ गाव आणि पंचक्रोशीतील महामाई, सोनसाखळी, देव रवळनाथ, तसेच त्रिमुखी सोमजाई देवींच्या महत्त्वाचे दर्शन घडते.
स्थानिक कलाकारांनी एकत्र येऊन साकारलेले हे गीत केवळ भक्तीभाव व्यक्त करणारे नसून, स्थानिक संस्कृतीचा अभिमानही वाढवणारे ठरत आहे. लवकरच हे गीत रसिकांच्या भेटीला येणार असून, गावच्या मातीतून जन्मलेल्या या कलाकृतीला निश्चितच उदंड प्रतिसाद मिळेल.
हॅशटॅग्स:
#महामाईदेवी #तवसाळगाव #सोनसाखळीदेवी #गुहागर #RatnagiriCulture #MarathiBhaktiGeet #SaptrangiKalaManch #LocalArtistsPride