काश्मीरमधील हल्ल्यावर चिपळूण राष्ट्रवादी काँग्रेसचा निषेध
दहशतवाद्यांच्या अमानवी कृत्याचा तीव्र निषेध; शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण
तळवली (प्रतिनिधी – मंगेश जाधव) – जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा चिपळूण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून तीव्र निषेध करण्यात आला. या पार्श्वभूमीवर पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी यांना निवेदन सादर करून या घटनेचा निषेध नोंदवला तसेच हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
या वेळी आमदार शेखर निकम, प्रदेश उपाध्यक्ष शौकत मुकादम, प्रदेश चिटणीस जयंद्रथ खताते, ज्येष्ठ नेते दादा साळवी, पांडूशेठ माळी, राजाभाऊ चाळके, तालुकाध्यक्ष नितीन उर्फ अबूशेठ ठसाळे, शहराध्यक्ष मिलिंद कापडी, माजी सरपंच दशरथ दाभोळकर, प्रादेशिक युवक सचिव डॉ. राकेश चाळके, महिला प्रदेश सरचिटणीस दिशा दाभोळकर, महिला जिल्हा कार्याध्यक्ष रिहाना बिजले, महिला तालुकाध्यक्ष जागृती शिंदे, महिला शहराध्यक्ष अदिती देशपांडे, महिला विधानसभा क्षेत्राध्यक्ष मनाली जाधव, महिला उपतालुकाध्यक्ष पूर्व अहिरे, युवक तालुका अध्यक्ष निलेश कदम, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष समीर काझी, शहर सचिव मनोज जाधव यांच्यासह अन्य अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्ट केले की, देशाच्या सुरक्षेसाठी व एकतेसाठी पक्ष नेहमीच एकजुटीने उभा राहणार आहे.
हॅशटॅग्स:
#PahalgamAttack #NCPChipalun #NCPProtest #JawanTribute #TerrorismCondemnation #KashmirAttack #ShekharNikam #RatnagiriNews