बळीराज सेनेच्या गुहागर तालुका पदाधिकाऱ्यांची उत्साही बैठक शृंगारतळीत संपन्न
जिल्हाध्यक्ष पराग कांबळे, तालुकाध्यक्ष अरुण भुवड यांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती; जनसंपर्क कार्यालयासाठी नवीन प्रमुखाची निवड
आबलोली (संदेश कदम)
गुहागर तालुक्यातील बळीराज सेनेच्या विशेष पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक रविवारी शृंगारतळी येथील जनसंपर्क कार्यालयात उत्साहात पार पडली. या बैठकीस जिल्हाध्यक्ष पराग कांबळे, तालुका संपर्क प्रमुख संतोष निवाते, तालुकाध्यक्ष अरुण भुवड, उपाध्यक्ष संतोष पास्टे, विधानसभा महिला आघाडी प्रमुख ऐश्वर्या कातकर, तालुका महिला आघाडी प्रमुख स्वप्नाली डावल, तालुका महिला सचिव स्वेतांबरी मोहिते, उपाध्यक्ष श्रावणी शिंदे, तळी शहराध्यक्ष सुभाष रजपूत, कार्यकारिणी सदस्य विनायक घाणेकर, अंजनवेल विभागप्रमुख अशोक रावणंग, तसेच महिला आघाडीच्या सौ. कातकर आणि डावल यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीत बळीराज सेनेच्या पुढील कार्ययोजनांबाबत वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. सामाजिक, राजकीय आणि शासकीय विकास कामांचा आढावा घेण्यात आला तसेच पदाधिकाऱ्यांच्या समस्या ऐकून घेण्यात आल्या.
दरम्यान, जनसंपर्क कार्यालय प्रमुख म्हणून तळी शहराध्यक्ष सुभाष रजपूत यांची निवड करण्यात आली. जनतेसाठी कार्यालयात भेटण्याची वेळ सकाळी ११ ते दुपारी २ अशी निश्चित करण्यात आली असून नागरिकांनी या वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.
बैठकीची सुरुवात दिवंगत नेते नंदकुमार मोहिते आणि सीमेवरील हुतात्मा नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली.
बैठकीत तालुकाध्यक्ष अरुण भुवड, तालुका संपर्क प्रमुख संतोष निवाते व जिल्हाध्यक्ष पराग कांबळे यांनी विशेष मार्गदर्शन केले.
#बळीराजसेना #गुहागर #जनसंपर्ककार्यालय #तालुकाबैठक #RatnagiriNews