पत्रकार सुरक्षा समितीचा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा 12 मे रोजी संपन्न होणार प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांची माहिती

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

पत्रकार सुरक्षा समितीचा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा 12 मे रोजी संपन्न होणार प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांची माहिती

सोलापूर (प्रतिनिधी ) नंदकुमार बागडेपाटील 

पत्रकार सुरक्षा समिती च्या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्या बाबत सोलापूर येथे बैठक घेण्यात आली बैठकीच्या अध्यक्षस्थानी शहराध्यक्ष आन्सर तांबोळी (बी एस ) होते पत्रकार सुरक्षा समिती वतीने गेल्या आठ वर्षापासून प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना पत्रकारांसाठी आरोग्य योजना विमा योजना यादीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती राज्यातील पत्रकारांचे शासन दरबारात नोंदणी राज्यातील युट्युब व पोर्टलला शासकीय मान्यता ग्रामीण भागातील पत्रकारांना एसटी बस मधून मोफत प्रवास इत्यादी विषयावर पत्रकार सुरक्षा समितीचे वतीने आंदोलन उपोषण निवेदन त्याचबरोबर राज्य सरकारकडे पत्रव्यवहार करत असून पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा पत्रकार सुरक्षा समिती सातत्याने प्रयत्न करत आहे. पत्रकारितेबरोबर एक सामाजिक बांधिलकी म्हणून पत्रकार सुरक्षा समिती वतीने दरवर्षी समाजात उल्लेखनीय काम करणाऱ्या आदर्श पत्रकार आदर्श वकील आदर्श समाजसेवक कृषिरत्न कृषी भूषण इत्यादी व्यक्तीना विविध मान्यवराच्या हस्ते सन्मानचिन्ह सन्मानपत्र गौरवपूर्वक देण्यात येतो पत्रकार सुरक्षा समितीचा राज्यस्तरीय 2025 चा पुरस्कार कार्यक्रम सोलापूर येथील समाज कल्याण केंद्र रंगभवन चौक सोलापूर या ठिकाणी सोमवार दिनांक 12/ 5/2025 रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांनी दिली आहे
या बैठकीला पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष अतुल भडंगे संघटक सादिक शेख सचिव अंबादास गज्जम जिल्हा उपाध्यक्ष कलीम शेख शहर कार्यकारी अध्यक्ष वसीम राजा बागवान कार्याध्यक्ष राजू वग्गू शहर समन्वयक लक्ष्मण सुरवसे दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद कबीर तांडुरे वैभव राऊत इत्यादी उपस्थित होते.

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.

bhaskr

Leave a Comment

आणखी वाचा...