संस्कृत भाषेतून महाराष्ट्र विकासाला चालना द्या – डॉ. दिनकर मराठे यांचे आवाहन
महाराष्ट्र दिनानिमित्त रत्नागिरी संस्कृत उपकेंद्रात कार्यक्रम; कामगार दिनाचाही सन्मान
तळवली (मंगेश जाधव) – “महाराष्ट्र आज विविध क्षेत्रांत अग्रेसर आहे. आपण सर्वजण आपापल्या कर्तृत्वातून राज्याच्या प्रगतीत योगदान देत आहोत. मात्र, आता संस्कृत भाषेच्या माध्यमातूनही महाराष्ट्राच्या विकासाला हातभार लावण्याची गरज आहे,” असे प्रेरणादायी प्रतिपादन रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांनी केले.
महाराष्ट्र दिनानिमित्त रत्नागिरी संस्कृत उपकेंद्रात आयोजित विशेष कार्यक्रमात डॉ. मराठे बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कामगार दिनानिमित्त त्यांनी “कामगार हा देशाचा आधारस्तंभ आहे. त्यांच्या कष्टाविषयी प्रत्येकाने कृतज्ञता आणि आदरभाव बाळगणे गरजेचे आहे,” असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. अक्षय माळी यांनी केले. यावेळी उपकेंद्रातील प्राध्यापक, कर्मचारी वर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हॅशटॅग्स:
#महाराष्ट्रदिन2025 #संस्कृतभाषा #डॉदिनकरमराठे #रत्नागिरीघडतेय #कामगारदिन #शिक्षणआणिविकास #TalavaliNews
फोट