हापूसची वातानूकुलीत सफर! रत्नागिरीतून आता थेट ग्राहकांपर्यंत ताजेपणासह पोहोचणार आंबा
सिंधू-रत्न समृद्ध योजनेतून मिळालेल्या रेफर व्हॅनचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
रत्नागिरी – उन्हाळ्यात हापूस आंब्याच्या वाहतुकीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी आता रत्नागिरी जिल्ह्यातील बागायतदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. सिंधू-रत्न समृद्ध योजनेतून जिल्हा पणन मंडळाला वातानूकुलीत रेफर व्हॅन मिळाली असून, तिचे लोकार्पण पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले.
सध्या आंब्याचा भरपूर हंगाम सुरू असून, मुंबई, पुणे यांसारख्या शहरांत आंबा पोहोचवताना उष्णतेमुळे फळांचे नुकसान होते. त्यामुळे फळांमध्ये साका तयार होतो आणि गुणवत्ता घसरते. हे लक्षात घेऊन रत्नागिरी जिल्हा सहकारी आंबा उत्पादक संघाने दोन रेफर व्हॅनची मागणी केली होती. त्यापैकी एक व्हॅन प्राप्त झाली असून, बागायतदारांसाठी ती वापरात आणली जाणार आहे.
या व्हॅनमुळे पिकलेला हापूस थेट वातानूकुलीत व्यवस्थेत ग्राहकांपर्यंत पोहोचेल, त्यामुळे त्याची ताजेपणा, चव आणि दर्जा टिकून राहणार आहे. शिवाय आंब्याला चांगला दर मिळण्याची शक्यता असून, स्वस्त दरात वाहतुकीचा पर्यायही उपलब्ध होणार आहे.
पोलिस परेड मैदानावर झालेल्या लोकार्पण सोहळ्यात जिल्हा प्रशासन, बागायतदार, आंबा उत्पादक संघाचे सदस्य उपस्थित होते. येत्या काही दिवसांत दुसरी व्हॅनही मिळण्याची शक्यता असून, आंबा वाहतुकीचे चित्र आता बदलणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
#हापूसआंबा #रत्नागिरीहापूस #रेफरव्हॅन #वातानुकुलीतवाहतूक #उदयसामंत #सिंधुरत्नसमृद्ध #RatnagiriMango #HapusTransport #FarmToMarket
फोट