तळवली भेळेवाडी येथे उद्यापासून अमृतमहोत्सवी कार्यक्रमांचे आयोजन
गुहागर प्रतिनिधी
तालुक्यातील तळवली भेळेवाडी येथे उद्या शनिवार दि.3 व रविवार दी.4 रोजी अमृतमहोत्सवी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
गुहागर तालुक्यातील तळवली येथे सुमारे 75 वर्षांपूर्वी नाट्य परंपरा सुरू झाली. तत्कालीन नाट्य कलाकारांनी एकत्र येत श्री सुकाई देवी उज्ज्वल नाट्य मंडळ भेळेवाडी या नाट्य मंडळाच्या माध्यमातून ही नाट्य परंपरा सुरू केली.भेळेवाडीतील भावी पिढीने देखील ही परंपरा अविरतपणे आजही सुरू ठेवली आहे.या स्थापनेला जवळजवळ 75 वर्ष पूर्ण होत असून यानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन भेळेवाडी ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले आहे.यावेळी 75 वर्षातील जेष्ठ नागरिक,माहेरवाशीण, सासुरवाशीण तसेच नाट्यकलाकार यांचा सत्कार सोहळा पार पडणार आहे.या संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन सिने अभिनेते शिवाजी मालवणकर करणार आहेत.शनिवार 3 रोजी रात्री 10 वा. सांस्कृतिक कार्यक्रम तर रविवार दि.4 रोजी रात्री 10.30 वाजता दोन अंकी विनोदी नाटक “सासरा मागतो आसरा” हा नाट्यप्रयोग पार पडणार आहे.तरी या कार्यक्रमांचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन भेळेवाडी अमृतमहोत्सव कमिटी,भेळेवाडी स्थानिक कमिटी व भेळेवाडी ग्रामथ व महिला मंडळ यांनी केले आहे.
बातमीदार – आशिष कर्देकर