जागतिक परिषदेत झळकणार कोकणचे पारंपरिक पालखी नृत्य!
‘वेव्हज २०२५’ मध्ये नाचणेच्या नादब्रह्म पथकाला संधी; पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत सादरीकरण
रत्नागिरी ( वार्ताहर) – कोकणातील होळीच्या शिमगा उत्सवातील एक खास पारंपरिक कला म्हणून ओळखले जाणारे पालखी नृत्य आता जागतिक व्यासपीठावर झळकणार आहे. नाचणे येथील नवलाई नादब्रह्म ढोल-ताशा व पालखी नृत्यपथक यांना ‘वेव्हज २०२५’ या जागतिक परिषदेच्या सांस्कृतिक सत्रात सादरीकरणाची संधी मिळाली आहे. २ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हे सादरीकरण होणार आहे.
‘वेव्हज २०२५’ ही जागतिक परिषद मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलातील जिओ वर्ल्ड सेंटर येथे १ मेपासून सुरु झाली असून, ४ मेपर्यंत विविध सत्रांमध्ये माध्यम व मनोरंजन उद्योगाच्या भविष्यावर चर्चा होणार आहे. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालय आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद आयोजित करण्यात आली आहे.
या परिषदेत कोकणच्या लोकपरंपरेचा आणि सांस्कृतिक समृद्धीचा ठसा उमटवणाऱ्या नादब्रह्म पथकाच्या सहभागामुळे रत्नागिरी जिल्ह्यासाठीही हा गौरवाचा क्षण ठरणार आहे.
—
#कोकणसंस्कृती #पालखी_नृत्य #वेव्हज2025 #नाचणे #रत्नागिरी #ढोलताशा #WAVES2025 #ModiInMumbai #महाराष्ट्रसंस्कृती
फोटो