रत्नागिरीत मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे उद्घाटन
पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन; गरजू रुग्णांना तातडीने मदतीचा दिलासा मिळणार
रत्नागिरी : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभरातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील तहसीलदार कार्यालय इमारतीत मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
या कक्षाचे उद्घाटन रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा शासकीय रुग्णालयाचे डॉ. विकास कुमरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम वाघधरे, सहाय्यता निधी कक्षातील क्लार्क उदय नाखरेकर आणि सोशल सर्व्हिस सुप्रिटेंडंट अनिता पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान डॉ. शुभम वाघधरे यांनी पालकमंत्री ना. उदय सामंत यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या कक्षाच्या स्थापनेमुळे गरजू रुग्णांना वैद्यकीय मदतीसाठी तातडीने आर्थिक सहाय्य मिळण्यास मोठा दिलासा मिळणार आहे.
हॅशटॅग्स:
#रत्नागिरी #उदयसामंत #मुख्यमंत्रीसहाय्यतानिधी #आरोग्यसेवा #सरकारीयोजना #RatnagiriNews #CMReliefFund
फोटो