उद्या राष्ट्रवादी चे नेते जितेंद्र आव्हाड रत्नागिरी दौऱ्यावर
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते जितेंद्र आव्हाड यांचा रत्नागिरी दौरा – ४ मे रोजी मेळावा
स्वयंवर मंगल कार्यालय येथे कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा; बशीर मुर्तुजा यांचे आवाहन
रत्नागिरी – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) चे कोकण प्रभारी आमदार जितेंद्र आव्हाड यांचे शनिवार, 3 मे 2025 रोजी रात्री 9 वाजता रत्नागिरीमध्ये आगमन होणार आहे. त्यांच्या कोकण दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रविवार, 4 मे रोजी सकाळी 11 वाजता रत्नागिरीतील स्वयंवर मंगल कार्यालय, बोर्डिंग रोड, जुनामाळ नाका येथे पक्षाचे जिल्हास्तरीय कार्यकर्ते, पदाधिकारी आणि हितचिंतक यांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्याचे आयोजन महाराष्ट्र प्रदेश सचिव आणि कोकण-रत्नागिरीचे लोकनेते बशीर भाई मुर्तुजा यांनी केले असून त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना व राष्ट्रवादीप्रेमींना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
नौसीन अहमद काझी (जिल्हाध्यक्ष, युवक रत्नागिरी – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट) यांच्याकडूनही मेळाव्याची माहिती देण्यात आली आहे.
हॅशटॅग्स:
#जितेंद्रआव्हाड #NCPSharadPawar #रत्नागिरी #राजकारण #कोकणदौरा #RatnagiriPolitics #NCPMelava
फोटो