फक्त ६ दिवसांत भारतावर १० लाख सायबर हल्ले! ५ देशांचा ‘डिजिटल युद्ध’ कट बाहेर

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

फक्त ६ दिवसांत भारतावर १० लाख सायबर हल्ले! ५ देशांचा ‘डिजिटल युद्ध’ कट बाहेर

 

इकोज ऑफ पहलगाम’ अहवालातील धक्कादायक माहिती; पाकिस्तान, बांगलादेश, मोरोक्को, इंडोनेशिया आणि मध्यपूर्वेतील कट्टर सायबर गटांचा सहभाग

 

मुंबई : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतावर केवळ ६ दिवसांत तब्बल १० लाख सायबर हल्ले झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र सायबर सेलच्या ‘इकोज ऑफ पहलगाम’ या अहवालातून या सायबर युद्धाची भयानक व्याप्ती उघड झाली आहे.

 

या हल्ल्यांमागे पाकिस्तान, बांगलादेश, मोरोक्को, इंडोनेशिया आणि मध्यपूर्वेतील इस्लामिक सायबर गटांचा हात असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. महाराष्ट्र सायबरचे एडीजी यशस्वी यादव यांनी सांगितले की, “हल्ल्यानंतर सायबर आक्रमणांची लाट उसळली असून, भारतीय संरक्षण संस्थांना लक्ष्य करणारा ‘टीम इन्सेन पीके’ हा सायबर गट सर्वात सक्रिय आहे.”

टार्गेट झालेले घटक:

आर्मी कॉलेज ऑफ नर्सिंग

सैनिक वेल्फेअर पोर्टल्स

आर्मी पब्लिक स्कूल

इतर सायबर गटांचे हल्ले:

 

बांगलादेशचा MTBD गट: शैक्षणिक पोर्टल्स, ई-गव्हर्नन्स साइट्स व बँकिंग संस्थांवर DDoS आणि DNS हल्ले

 

इंडोनेशियाचा इंडो हॅक्स सेक: टेलिकॉम डेटाबेस लीक, डार्क वेबवर पासवर्ड विक्री

 

मध्यपूर्वेतील गोल्डन फाल्कन व मोरोक्कोचा मोरोक्कन ड्रॅगन्स: भारतीय IT इन्फ्रास्ट्रक्चरवर मालवेअर हल्ले

 

 

या सर्व हल्ल्यांचे स्वरूप स्वतंत्र नसून संघटित व एकत्रित रणनीतीने हे हल्ले होत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. २६ एप्रिलपासून सुरू झालेली ही सायबर हल्ल्यांची मालिका अद्याप थांबलेली नाही.

 

रेल्वे, बँकिंग, टेलिकॉम, IT आणि महत्त्वाच्या सरकारी यंत्रणा हे हल्लेखोरांचे मुख्य लक्ष्य आहेत. सायबर सुरक्षेतील त्रुटींचा फायदा घेत भारतीय डेटाचे ‘टेराबाइट्स’ प्रमाणात गुप्त माहिती डार्क वेबवर लीक झाली आहे, असा गंभीर इशारा सायबर सेलने दिला आहे.

 

हॅशटॅग्स:

 

#CyberAttackIndia #DigitalWar #MaharashtraCyber #IndiaUnderAttack #DarkWebLeaks #CyberSecurityBreach #EchoesOfPahalgam

 

फोटो

 

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.

Leave a Comment

आणखी वाचा...