सडवलीतील विजय भुवड यांचा मृत्यू; प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अमानवी वागणुकीवर संताप
व्हरांड्यात ठेवलेला मृतदेह, खाजगी ॲम्बुलन्सद्वारे शवविच्छेदन, घटनास्थळी पंचनामा नाही

लांजा ( जितेंद्र चव्हाण वार्ताहर) – दि. ३ मे २०२५ रोजी सायंकाळी सडवली (ता. लांजा, जि. रत्नागिरी) येथील विजय केरू भुवड (वय ४०) यांना गंभीर अवस्थेत साठवली प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. उपचार सुरू होण्याआधीच त्यांचा मृत्यू झाल्याचे समजते. मात्र मृत्यू झाल्यानंतर त्यांचा मृतदेह रुग्णालयाच्या व्हरांड्यात काही काळ तसेच ठेवण्यात आला. ही घटना अत्यंत लांच्छनास्पद आणि माणुसकीला काळिमा फासणारी असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
या प्रकारावरून आरोग्य यंत्रणेतील हलगर्जीपणा पुन्हा समोर आला आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार, मृतदेह सायंकाळी ५ वाजता आरोग्य केंद्रात आणण्यात आला होता. त्यानंतर तब्बल २ तास मृतदेह रुग्णालयाच्या व्हरांड्यातच ठेवण्यात आला. सुमारे ७:२४ वाजता ‘जिजाऊ संस्था’च्या खाजगी ॲम्बुलन्सद्वारे मृतदेह लांजा येथे शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला. विशेष म्हणजे, प्राथमिक आरोग्य केंद्राकडे स्वतःची ॲम्बुलन्स असताना खाजगी वाहनाचा वापर का करण्यात आला, याबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
या घटनेबाबत विचारणा केली असता डॉक्टरांनी सांगितले की, “आम्ही केवळ दोन स्टाफ होतो. पोलीस पाटील घटनास्थळी उपस्थित नव्हते. त्यांनी मृतदेह आणून रुग्णालयात सोडला आणि निघून गेले.” तसेच, “उपचार वॉरंटवरच कराव्या लागतात, आणि परिस्थितीनुसारच निर्णय घ्यावा लागतो,” असेही डॉक्टरांचे म्हणणे आहे.
घटनास्थळी कोणताही पंचनामा न झाल्याचेही उघड झाले असून, यामुळे प्रशासनातील समन्वय आणि जबाबदारीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. या प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
हॅशटॅग्स:
#RatnagiriNews #SatavliPHC #VijayBhuvad #LanjaTaluka #HospitalNegligence #HealthSystemFailure #KonkanNews
फोट