गुहागर तालुका भाजप अध्यक्ष अभय भाटकर यांचा महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठानतर्फे सत्कार
सामाजिक, शैक्षणिक व पर्यटन क्षेत्रात कार्यरत असलेल्या अभय भाटकर यांच्या नेतृत्वगुणांना मान्यता; सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याची भावना
गुहागर | महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठान या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेच्या वतीने गुहागर तालुका भाजप अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभय भाटकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी संस्थेचे संचालक मनोज पाटील, पत्रकार संतोष घुमे, अमेय हळदणकर आदी मान्यवर उपस्थित होते. अभय भाटकर हे सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, आरोग्य आणि पर्यटन क्षेत्रात कार्यरत असलेले बहुआयामी व्यक्तिमत्व आहेत. विशेषतः सहकार व पर्यटन क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांचा लोकसंपर्क दांडगा असून, सामाजिक प्रश्नांची उत्तम जाण व सर्वसामान्यांच्या मदतीस तत्पर असलेला त्यांचा ओळख आहे.
सत्कारप्रसंगी उत्तर देताना अभय भाटकर यांनी महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठानच्या या गौरवाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. “विविध क्षेत्रांतील सर्व घटकांना बरोबर घेऊन गुहागर तालुक्याचा सर्वांगीण विकास साधण्याचा माझा प्रयत्न राहील,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
हॅशटॅग्स:
#AbhayBhatkar #GuhagarNews #BJP #MaharashtraJanataVikasPratishthan #SocialLeadership #RatnagiriVarta #गुहागर #रत्नागिरी
फोटो