वेलदूर नवानगर मराठी शाळेत आरोग्यविषयक मार्गदर्शन शिबिर यशस्वीपणे संपन्न
क्लबफूट आजाराविषयी जागरूकता आणि सामाजिक सहभाग वाढवण्यासाठी शाळेत विशेष उपक्रम; सुप्रिया कांबळे आणि सिव्हिल हॉस्पिटल रत्नागिरीचे योगदान
वेलदूर (गुहागर) | जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर नवानगर मराठी शाळेमध्ये क्लबफूट या आजाराविषयी जनजागृतीसाठी विशेष आरोग्यविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरात अपंगत्व कार्यक्रम समन्वयक सुप्रिया शिवाजी कांबळे मॅडम आणि सिव्हिल हॉस्पिटल रत्नागिरी येथील श्री. कदम सर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक डॉ. श्री. मनोज पाटील, उपशिक्षिका अंजली मुद्दमवार, सुषमा गायकवाड, धन्वंतरी मोरे, अफसाना मुल्ला आणि विद्यार्थी उपस्थित होते.
कांबळे मॅडम यांनी क्लबफूट या जन्मजात आजाराविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. हा आजार लवकर निदान झाल्यास मोफत उपचार उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी दिली आणि गरजूंनी सिव्हिल हॉस्पिटल रत्नागिरीशी संपर्क साधावा, असे आवाहन केले. त्याचबरोबर, विद्यार्थ्यांनी फळांच्या बिया जमा करून त्या भविष्यात सरकारी जागांमध्ये लावाव्यात, असा प्रेरणादायक सामाजिक उपक्रमही त्यांनी मांडला.
प्रमुख मार्गदर्शनानंतर डॉ. मनोज पाटील सरांनी अशा आजाराने प्रभावित मुलांची माहिती शाळेत मिळाल्यास त्वरित उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलकडे पाठवण्याचे आश्वासन दिले. बियांचा संचय करण्यासही विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुषमा गायकवाड यांनी केले, तर आभार प्रदर्शन अफसाना मुल्ला यांनी केले.
हॅशटॅग्स:
#HealthAwareness #Clubfoot #WeldurNavanagarSchool #RatnagiriNews #GuhagarUpdates #SocialHealthProject #ZPSchool #रत्नागिरी #गुहागर
फोटो