आरवली घाटात बिबट्याचा अपघाती मृत्यू; अज्ञात वाहनाची धडक जीवावर बेतली!
मुंबई-गोवा महामार्गावरील दुर्दैवी घटना; वनविभागाच्या उशिरा प्रतिसादामुळे ग्रामस्थांत नाराजी
Viral news
सावर्डे – मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील आरवली घाटात एका बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. रात्रीच्या सुमारास महामार्ग ओलांडताना भरधाव अज्ञात वाहनाने बिबट्याला जोरदार धडक दिली. या धडकेत बिबट्याच्या डोक्याला गंभीर इजा होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.
सकाळी महामार्गावर बिबट्याचा मृतदेह आढळून आला. ही बाब गावचे सरपंच निलेश भुवड, पोलीस उपनिरीक्षक विवेक साळवी, पोलीस पाटील मेने व नागरिकांच्या निदर्शनास आली. त्यांनी तात्काळ वन विभागाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.
मात्र, माहिती देऊनही वन विभागाचे अधिकारी उशिरा घटनास्थळी दाखल झाले. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. या अपघातामुळे वन्यजीव रस्त्यावर सुरक्षिततेच्या प्रश्नावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
#हॅशटॅग्स:
#आरवलीघाट #बिबट्याचामृत्यू #मुंबईगोवामहामार्ग #वन्यजीवसंरक्षण #RatnagiriNews #KonkanWildlife