कादंबरी संदीप महाजन — बहुमुखी गुणवत्तेची झळाळती कामगिरी!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

कादंबरी संदीप महाजन — बहुमुखी गुणवत्तेची झळाळती कामगिरी!

नवी मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : पाचोरा (जि. जळगाव) येथील कादंबरी संदीप महाजन हिने एम.जी.एम. वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, कामोठे (नवी मुंबई) येथून फिजिओथेरपी पदवी (बीपीटी) अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात उल्लेखनीय यश संपादन करत आपल्या कुटुंबाचा आणि गावाचा अभिमान वाढवला आहे.

कादंबरीने केवळ अध्ययनातच नव्हे, तर महाविद्यालयीन जीवनात सांस्कृतिक आणि क्रीडाक्षेत्रातही आपली चमक दाखवली. अभ्यासाच्या जोडीने आपल्या अंगभूत कलागुणांना योग्य वाव देत, तिने विविध कार्यक्रमांत उत्स्फूर्त सहभाग घेतला. याचे उत्तम उदाहरण म्हणजे सांस्कृतिक विभाग प्रमुख या मानाच्या पदासाठी झालेल्या निवडणुकीत मिळवलेला निर्विवाद विजय. या माध्यमातून तिने नेतृत्वगुणही सिद्ध केले.

दि. ७ मे २०२५ रोजी जाहीर झालेल्या अंतिम वर्षाच्या निकालात कादंबरीने प्रत्येक विषयात मिळवलेली ‘उत्कृष्ट’ (ए+) श्रेणी तिच्या सातत्यपूर्ण मेहनतीचा आणि चिकाटीचा स्पष्ट पुरावा आहे. तिच्या या यशाने केवळ आई-वडिलांचे नव्हे तर शिक्षकांचे, आणि संपूर्ण कुटुंबाचे हृदय आनंदाने भरून आले आहे.

कादंबरीचं हे बहुआयामी यश पुढील वाटचालीसाठी प्रेरणादायी ठरेल, यात शंका नाही. तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी संपूर्ण महाजन कुटुंबाकडून हार्दिक शुभेच्छा आणि आशीर्वाद.

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.

bhaskr

Leave a Comment

आणखी वाचा...