गजानन घाडगे यांचा पोलिस आयुक्तांकडून गौरव! – १०० दिवसांच्या मोहिमेत मिळवले दुसरे स्थान
पनवेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांच्या उत्कृष्ट प्रशासकीय कामगिरीचे नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी केले कौतुक
पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांनी १०० दिवसांच्या क्षेत्रीय कार्यालय सुधारणा मोहिमेत उत्कृष्ट प्रशासकीय कामगिरी करत दुसरा क्रमांक पटकावला आहे. त्यांच्या या यशाबद्दल नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी त्यांचा विशेष सत्कार केला.
आयुक्त भारंबे यांनी घाडगे यांना प्रशस्तीपत्रक देत, त्यांच्या कामगिरीची प्रशंसा केली आणि “भविष्यातही अशीच उज्ज्वल कामगिरी होईल” असा दृढ विश्वास व्यक्त केला. गजानन घाडगे हे कर्तव्यदक्ष आणि दबदबा असलेले पोलिस अधिकारी म्हणून ओळखले जातात. गुन्हेगारांवर त्यांचा कायमचा वचक राहिला आहे.
यापूर्वी त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाणे आणि सोलापूर येथेही पोलीस निरीक्षक पदावर उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. त्यांच्या डॅशिंग कार्यशैलीमुळे ते पोलीस दलात वेगळ्या उंचीवर पोचले आहेत.
हॅशटॅग्स:
#गजाननघाडगे #पनवेलपोलीस #नवीमुंबईपोलीस #पोलीसगौरव #प्रशस्तीपत्रक #मिलिंदभारंबे #पोलीसअधिकारी
फोटो