वंचितचे अण्णा जाधव हल्ला प्रकरण : बदलापूर येथून एकाला घेतले ताब्यात

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

वंचितचे अण्णा जाधव हल्ला प्रकरण : बदलापूर येथून एकाला घेतले ताब्यात

 

गुहागरतील हल्ल्यानंतर फरार असलेल्या संदीप पवारला गुन्हे शाखेने केली अटक; आज न्यायालयात हजर

 

गुहागर ( मंगेश जाधव प्रतिनिधि) तालुक्यात विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष विकास उर्फ अण्णा जाधव यांच्यावर नरवण येथे धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला झाला होता. या प्रकरणातील फरार आरोपी संदीप पवार याला अखेर मुंबईतील बदलापूर येथून गुन्हे अन्वेषण शाखेने ताब्यात घेतले आहे.

 

१७ नोव्हेंबर २०२४ रोजी नरवण येथील ‘हॉटेल सावली’ येथे अण्णा जाधव हे पत्नी आणि सहकाऱ्यांसोबत असताना, त्यांना फोन आल्यावर ते बाहेर गेले. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी एका उमेदवाराचं नाव घेऊन “आमच्याविरोधात बोलतोस का?” असे विचारत धारदार चाकूने हल्ला केला. पोटावर वार होणार असताना त्यांनी हात पुढे केला आणि गंभीर जखमी झाले. तसेच त्यांच्या वाहनावरही दगडफेक झाली होती.

 

या घटनेनंतर मारेकरी दुचाकीवरून पसार झाले. जखमी जाधव यांच्यावर तत्काळ गुहागर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. या हल्ल्यामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली होती.

 

या गुन्ह्यातील अन्य दोन आरोपींना याआधीच अटक करण्यात आली होती. आता फरार असलेला संदीप पवार आज दिनांक १० मे रोजी गुहागर न्यायालयात हजर केला जाणार आहे. तपास पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुजित सोनावणे करत आहेत.

 

हॅशटॅग्स:

#गुहागर #वंचितआघाडी #अण्णाजाधव #संदीपपवार #RatnagiriNews #CrimeUpdate #AssemblyElections2024 #गुहागरहल्ला

 

फोटो

 

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.

Leave a Comment

आणखी वाचा...