भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर नौदल सज्ज
नौदलाकडून मासेमारीसाठी बंद क्षेत्र जाहीर; उल्लंघन केल्यास दिसताच गोळीबार
रत्नागिरी, दि. ९ (रत्नागिरी वार्ताहर):
भारत-पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर समुद्रातील सुरक्षेचा भाग म्हणून भारतीय नौदल आणि मत्स्यव्यवसाय विभाग यांच्यात ७ मे रोजी बैठक पार पडली. या बैठकीत नौदलाने काही ठिकाणी Offshore Defence Area (ODA) घोषित करत त्या भागात मासेमारीस सक्त मनाई केली आहे. संबंधित क्षेत्रात कोणतीही मासेमारी नौका दिसल्यास “दिसताच गोळीबार (Shoot to kill)” करण्याचे आदेश नौदलाला देण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष एम. देवेंदर सिंह यांनी दिली.
मासेमारीस बंद केलेले ठिकाणे:
- MH/BASSEIN क्षेत्र:
- 18°31’45″N, 072°09’40″E
- 18°32′04″N, 071°09’08″E
- 19°46′49″N, 072°11’27″E
- 19°46′42″N, 072°11’36″E
- NEELAM क्षेत्र:
- 18°49’11″N, 072°10’00″E
- 18°49’23″N, 072°25’01″E
- 18°09’59″N, 072°25’13″E
- 18°10’12″N, 072°10’00″E
महत्त्वाचे निर्देश:
उपरोक्त क्षेत्रात कोणतीही मासेमारी नौका मासेमारीस वा इतर कोणत्याही कारणासाठी जाणार नाही. संबंधित क्षेत्रात कोणतीही नौका आढळल्यास थेट कारवाई होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
नौकांची माहिती तातडीने द्यावी:
नौदल विभागाकडून संस्थानिहाय मासेमारी नौकांची माहिती मागवण्यात आली आहे. त्यामुळे सर्व परवाना धारकांनी आपापल्या नौकांची माहिती परवाना अधिकाऱ्यांमार्फत तात्काळ सहायक आयुक्त (मत्स्यव्यवसाय) कार्यालयाकडे सादर करावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
सतर्कतेचे आवाहन:
या पार्श्वभूमीवर सर्व मासेमारी नौका मालक व मच्छिमारांनी दक्ष राहून आपल्या नौका व कर्मचाऱ्यांना वरील प्रतिबंधित क्षेत्रात पाठवू नये, असे प्रशासनाचे आवाहन आहे.
#भारतीयनौदल #मासेमारीप्रतिबंध #RatnagiriNews #ShootToKill #NoFishingZone #ODAareas #मच्छिमारसुरक्षा