विजय भोवड यांचा संशयास्पद मृत्यू; घातपाताचा संशय, लांजा पोलिसांकडे सखोल चौकशीची मागणी
साटवली येथे घडलेल्या मयत विजय भोवड या प्रकरणी सीसीटीव्ही तपासणीची मागणी
(लांजा प्रतिनिधी – जितेंद्र चव्हाण)
साटवली केळ (ता. लांजा) येथे ३ मे २०२५ रोजी विजय केरू भोवड (रा. सडवली) यांचा संशयास्पद मृत्यू झाला असून, हा मृत्यू घातपाताचा असावा असा संशय मयताचा भाऊ सुनील भोवड यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात मृत्यूच्या घटनाक्रमासंदर्भात सखोल चौकशीची मागणी केली आहे.
घटनेनंतर साटवलीचे पोलीस पाटील सदानंद किल्लेकर यांनी विजय भोवड यांचा मृतदेह साटवली प्राथमिक आरोग्य केंद्रात आणून ठेवला होता. मात्र, मृत्यूच्या वेळेपासून घटनास्थळाशी संबंधित काही बाबी संशयास्पद असल्याचे सुनील भोवड यांनी स्पष्ट केले आहे.
त्यांच्या मते, विजय दुपारी १२:३० वाजेपर्यंत घटनास्थळी उपस्थित होते. मात्र १२:३० ते ३:०० या दरम्यान ते कोठे होते, हे स्पष्ट नाही. त्याचप्रमाणे, इतक्या कमी वेळेत त्यांचा मृत्यू कसा झाला, हे समजणे कठीण असल्याने त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणी करण्यात आली आहे. घटनास्थळी दोन सीसीटीव्ही कॅमेरे असल्याचेही सुनील भोवड यांनी निदर्शनास आणले आहे.
या प्रकरणाची योग्यरीत्या चौकशी न झाल्यास वरिष्ठ पातळीवर तक्रार करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
सदर संपूर्ण प्रकरणाची खातेनिहाय तपास करण्यात यावा असे निवेदन मयत यांचे भाऊ सुनील भोवड यांनी लांजा पोलीस ठाण्यात दिले आहे.
हॅशटॅग्स:
#साटवली #लांजा #विजयभोवड #संशयास्पदमृत्यू #RatnagiriNews #PoliceInvestigation #CCTV