आज दुपारी दहावीचा निकाल जाहीर होणार; विद्यार्थ्यांनी ही लिंक तपासा
महाराष्ट्र बोर्डाचा निकाल दुपारी १ वाजता ऑनलाईन; गुणपडताळणीसाठी अर्जाची प्रक्रिया उद्यापासून
बातमी ….
नवी मुंबई (मंगेश जाधव): महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज, मंगळवार १३ मे रोजी दुपारी १ वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर होणार आहे. निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर पाहता येणार असून, यासंदर्भातील माहिती मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
यंदा राज्यभरात नऊ विभागीय मंडळांमार्फत दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च दरम्यान पार पडली. मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या विभागांतील लाखो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यामध्ये मुंबई विभागातून तब्बल ३,५८,८५४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते.
निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळे:
- https://results.digilocker.gov.in
- https://sscresult.mahahsscboard.in
- https://results.targetpublications.org
निकालानंतर कोणत्याही विषयाच्या गुणांबाबत शंका असल्यास विद्यार्थ्यांना गुणपडताळणी, उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीची मागणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करता येणार आहे. ही प्रक्रिया १४ मेपासून सुरू होणार असून, अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख २८ मे आहे.
हॅशटॅग्स:
#SSCResult2025 #दहावीचा_निकाल #MaharashtraBoard #ExamResults #Mahresult #10thResult #RatnagiriVartahar
फोटो