???? आयपीएल पुन्हा रंगणार! ..१७ मेपासून उर्वरित सामने; अंतिम सामना ३ जूनला
भारत-पाक तणाव निवळल्यानंतर बीसीसीआयचा मोठा निर्णय, प्लेऑफ व अंतिम सामन्यांचे नवीन वेळापत्रक जाहीर
मुंबई : भारत-पाकिस्तानमधील तणाव निवळल्यानंतर देशातील क्रिकेटप्रेमींसाठी मोठी आनंदवार्ता आली आहे. आयपीएल २०२५ पुन्हा सुरू होणार असून, बीसीसीआयने उर्वरित १७ सामन्यांचे नव्याने वेळापत्रक जाहीर केले आहे. येत्या १७ मेपासून स्पर्धेला पुन्हा प्रारंभ होणार असून अंतिम सामना ३ जून रोजी खेळवला जाईल.
भारत-पाक दरम्यान निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून आयपीएल थांबवण्यात आली होती. मात्र आता सरकार, सुरक्षा यंत्रणा आणि सर्व संबंधित भागधारकांशी सल्लामसलत करून बीसीसीआयने स्पर्धा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या वेळापत्रकानुसार काही दिवसांत दिवसाला दोन सामनेही खेळवले जातील.
पुनः सुरू होणाऱ्या पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आमने सामने येणार असून, हा सामना बंगळुरूच्या मैदानावर रंगणार आहे. पुढील सामने जयपूर, बेंगळुरू, लखनौ, दिल्ली, मुंबई आणि अहमदाबाद येथील मैदानांवर होणार आहेत.
नवीन प्लेऑफ वेळापत्रक असे:
पहिला क्वालिफायर : २९ मे
एलिमिनेटर : ३० मे
दुसरा क्वालिफायर : १ जून
अंतिम सामना : ३ जून
(प्लेऑफ सामन्यांची स्थळं लवकरच जाहीर होणार)
लीग टप्प्यातील शेवटचा सामना २७ मे रोजी लखनौमध्ये आरसीबी आणि लखनौ सुपर जायंट्समध्ये खेळवला जाईल. १८ मे रोजी दोन सामने होणार असून, दिवसाच्या सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज, तर संध्याकाळच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात लढत होईल.
—
#IPL2025 #BreakingNews #IPLReturns #BCCI #CricketNews #IPLPlayoffs #IndiaPakistanCeasefire #KKRvsRCB #IPLFinals #RatnagiriVartahar
फोटो