विषारी दारूमुळे अमृतसरमध्ये मृत्यूचे थैमान!
मजीठा परिसर हादरला; १४ जण ठार, ६ जणांची प्रकृती चिंताजनक
चंदीगड (१२ मे): पंजाबमधील अमृतसर जिल्ह्यातील मजीठा परिसरात विषारी दारू प्रकरणात तब्बल १४ जणांचा मृत्यू झाला असून सहा जणांची प्रकृती गंभीर आहे. सोमवारी रात्री ही घटना घडली. संबंधित व्यक्तींनी एकाच ठिकाणाहून बनावट दारू घेतल्याचा संशय आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
घटनेनंतर वैद्यकीय पथक तातडीने सक्रिय झाले असून, ५ गावांमध्ये घरोघरी जाऊन लोकांची तपासणी सुरू आहे. लक्षणे नसलेल्यांनाही रुग्णालयात नेले जात आहे. अमृतसरच्या उपायुक्त साक्षी साहनी यांनी सांगितले की, “मृतांची संख्या वाढू नये म्हणून प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. सरकार सर्वतोपरी मदत करत आहे.”
या प्रकरणी विषारी दारू विकणाऱ्या पुरवठादारांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी मजीठा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
#अमृतसर #विषारीदारू #Majitha #BreakingNews #PunjabNews #मृत्यू #RatnagiriVartahar
फोटो
स्रोत: एएनआय, पंजाब पोलीस
बातमी: रत्नागिरी वार्ताहर
[ratnagirivartahar.in]