१००% निकालाची परंपरा कायम! चंद्रकांत बाईत विद्यालय, आबलोलीचा दहावीचा झळाळता यश
श्रेयस विचारे व तन्वी मोरे प्रथम; ९८.४०% गुणांची कमाल कामगिरी
गुहागर ( संदेश कदम ) तालुक्यातील आबलोली येथील चंद्रकांत बाईत माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय या संस्थेने यंदाच्या इ. १० वी च्या निकालात पुन्हा एकदा यशाची परंपरा कायम ठेवली आहे. सन २०२४-२५ च्या एसएससी बोर्ड परीक्षेसाठी एकूण ५१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते आणि सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण होऊन १००% निकालाची परंपरा पुढे नेली आहे.
कु. श्रेयस सतीश विचारे व कुमारी तन्वी अनिल मोरे यांनी प्रत्येकी ९८.४०% गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर कुमारी किमया दिनेश नेटके हिने ९५.००% गुण मिळवून द्वितीय क्रमांक, कुमारी वैष्णवी विकास मेस्त्री हिने ९४.६०% गुणांसह तृतीय क्रमांक, कुमारी श्रावणी महेश साळवी हिने ९३.४०% गुणांसह चौथा क्रमांक, तर कुमारी आर्या धनदिप साळवी हिने ९०.४०% गुणांसह पाचवा क्रमांक पटकावला.
या यशाबद्दल विद्यालयाचे अध्यक्ष चंद्रकांतशेठ बाईत, कार्याध्यक्ष सचिनशेठ बाईत, मुख्याध्यापक डि. डी. गीरी तसेच शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक, पालक आणि विविध सामाजिक व धार्मिक संस्थांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
—
#SSCResult2025 #GuhagarNews #ChandrakantBaitVidyalaya #RatnagiriEducation #100PercentResult #TopStudents #MaharashtraBoardResult
फोटो